शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
4
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
5
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
6
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
7
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
8
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
9
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
10
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
12
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
13
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
14
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
15
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
16
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
17
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
19
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

रेल्वेने परप्रातियांना सोडण्याचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 10:46 PM

प्रवासी पासेस : आतापर्यंत २६२ नागरिकांचे अर्ज, संबंधित प्रशासनाच्या परवानगीनंतर निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : इतर राज्यातील ५६६ नागरिकांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी परवानगी मागितली असून त्यापैकी ३७ नागरिकांना प्रशासनाने प्रवासी पास दिल्याची माहिती नोडल अधिकारी तथा जिल्हा पूनर्वसन अधिकारी प्रज्ञा बढे-मिसाळ यांनी दिली़लॉकडाउनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या ५६६ नागरीकांपैकी २०० नागरीक उत्तरप्रदेशातील स्थलांतरीत मजुर आहेत़ त्यांना पासेसे देण्यापेक्षा त्यांच्यासाठी स्वतत्र रेल्वे सोडण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे़ जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या परवानगीने मध्य रेल्वेच्या भुसावळ येथील विभागीय कार्यालयाशी पत्रव्यवहार करुन युपीसाठी स्वतंत्र रेल्वे सोडण्याची सोडण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहितीही प्रज्ञा मिसाळ यांनी दिली़दरम्यान, महराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यात जाण्यासाठी आतापर्यंत २६२ नागरीकांनी आॅनलाईन अर्ज केले असून या नागरीकांना परवानगी द्यावी किंवा नाही याबाबत संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची एनओसी आल्यावर निर्णय घेण्यात येणार आहे़पुणे आणि नाशिक येथे जाण्यासाठी १४३ अर्ज आले आहेत़ मुंबई आणि मुंबई उपनगरांसाठी ६६ अर्ज, मराठवाडा आणि विदर्भातील अमरावतीसाठी १४, औरंगाबादसाठी २९ आणि नागपूरला जाण्यासाठी १० अर्ज जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़धुळे जिल्ह्यातून त्यांच्या इच्छित स्थळी (राज्याबाहेर) जाण्याचे पास, ना हरकत देण्यासाठी, आवश्यक असलेली परवानगी देण्याकरिता जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रज्ञा बढे- मिसाळ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय यादव यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.राज्य शासनाच्या एक मे रोजीच्या सुधारित आदेशानुसार लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्यात अडकलेले स्थलांतरीत कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना धुळे जिल्ह्यातून त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी व धुळे जिल्ह्यात येण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी सक्षम प्राधिकारी आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी वरील आदेश दिले आहेत. प्रवासी पाससाठी ँ३३स्र२://ूङ्म५्र1ि9.ेँस्रङ्म’्रूी.्रल्ल या आॅनलाइन संकेतस्थळावरील प्राप्त अर्जांवर जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती बढे कार्यवाही करतील.तसेच महाराष्ट्र राज्यांतर्गत प्रशासकीय विभागनुसार पास देण्यासाठी व ना हरकत देण्यासाठी देखील नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. मुंबई महानगर प्रदेश व कोकण विभागासाठी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, पुणे महानगर प्रदेश व नाशिक विभागासाठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण, अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागासाठी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे़नोडल अधिकाऱ्यांनी आॅनलाइन संकेतस्थळावर प्राप्त अर्जांवर कार्यवाही करावयाची आहे. शासन आदेशात नमूद पध्दतीने या अधिकाºयांनी कामकाज करावयाचे आहे, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत़दरम्यान, परप्रांतीय कामगारांसाठी रेल्वेची सोय करण्याचे काम सुरू असून त्यांनी रेल्वे स्थानकावर गर्दी करु नये़तातडीच्या शस्त्रक्रीयेसाठी रुग्णाला परवानगीमुंबई महानगर प्रदेश आणि कोकण विभागात आपल्या मुळ गावी परत जाण्यासाठी आतापर्यंत ६६ नागरीकांनी प्रवासी पास मिळविण्याकरिता आॅनलाईन पध्दतीने अर्ज केले आहेत़ त्यात धुळे जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे़ या रुग्णाला स्वादुपिंडाचा त्रास असल्याने तातडीने शस्त्रीक्रीया करणे आवश्यक होते़ त्यासाठीचे आवश्यक ते वैद्यकीय पुरावे रुग्णाने सादर केल्यानंतर तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी त्यांना मुंबईला जाण्याची परवानगी दिल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश आणि कोकण विभागाचे नोडल अधिकारी तथा निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी लोकमतला दिली़

टॅग्स :Dhuleधुळे