लोकमत न्यूज नेटवर्कसोनगीर : येथील जागृत सोमेश्वर महादेव मंदिराच्या यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेने यात्रोत्सवाचा थाटात समारोप झाला. या स्पर्धेत धुळ्यासह औरंगाबाद, चाळीसगाव, न्याहळोद, बोरीस, उडाने, नंदाणे, वर्षी शिरपूर, लामकानी आदी ठिकाणाहून मल्ल सहभाग झाले होते़ विजेता संघाला भांडी व रोख रक्कम देवून सन्मान करण्यात आला़ कुस्ती दंगलीची परपंरा यात्रौवाच्या दुसºया होणाºया कुस्त्यांची दंगलीला जुनी परंपरा आहे़ येथील कुस्ती स्पर्धेत काही मल्लांनी चपळता व सुरेख डावपेच दाखवित प्रेक्षकांचे डोळ्यांचे पारणे फिटले होते़ कुस्त्यांचे आयोजन एकलव्य ग्रुप व शबरी माता ग्रुपतर्फे करण्यात आले़ या स्पर्धेचे उदघाटन पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन यांच्या हस्ते झाले़ या स्पर्धेत भीमा भिल, पिंटू भिल, राजू भिल, दगा महाराज, सुभाष भिल, संदीप भिल, संजू वडार आदींनी परिश्रम घेतले़ स्पर्धेसाठी अर्थसहाय्य ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले़ पंच म्हणून माजी सरपंच दंगल धनगर, किशोर पावनकर, प्रेमल पटेल, राजूलाल भील, संदीप गुजर, राजु पाडव, सुनील भिल उपस्थित होते़ स्पर्धेत उडाने येथील सुनील भिल यांनी मुख्य कुस्ती जिंंकली. सोनगीर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त ठेवण्यात आला होता़
सोनगीर येथे कुस्ती स्पर्धा ठरली यात्रेचे आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 10:53 PM