शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

धुळ्याच्या ट्रक टर्मिनसमधील गाळ्यांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 11:22 AM

महापालिका : २० वर्षांपासून रखडलेला प्रश्न लागणार मार्गी, बाजारभावाने करणार लिलाव

ठळक मुद्देमुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसिडेन्सी पार्कच्या मागील बाजूस बांधलेल्या ४़६० हेक्टर जागेवरील ३० गाळयांच्या लिलावाबाबतचा निर्णय मंगळवारी आयोजित महासभेत घेतला जाणार आहे़प्रत्येक गाळयाला दरमहा ५ हजार ८७ रूपये भाडे आकारणी होणार असून ५ लाख ८ हजार ७०० रूपये अनामत रक्कम असणार आहे़ महापालिकेने केवळ गाळे बांधले असून त्याठिकाणी गॅरेज, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, संरक्षण भिंत, परमीट रूम व खानावळ, स्पेअरपार्ट विक्री, सीसीटिव्ही, पार्किंग यांसारख्या सेवा सुविधा पुरविणे आवश्यक होते़ मात्र केवळ गाळे बांधून मनपाने लिलावाचा निर्णय घेतला आहे़ट्रक टर्मिनस प्रश्नी महापालिकेने नाशिक महापालिकेकडून मार्गदर्शन मागविले होते, मात्र त्याबाबतही पुढे कार्यवाही झाली नाही़ हजार ८७ रूपये भाडेआकारणी़़़

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेतील सर्वात जुना प्रलंबित विषय असलेल्या व प्रचंड अडचणीतून निर्माण करण्यात आलेल्या ट्रक टर्मिनसचा प्रश्न अखेर मार्गी लावला जाणार आहे़ ट्रक टर्मिनससाठी बांधण्यात आलेल्या ३० गाळयांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय मंगळवारी आयोजित महासभेत घेतला जाणार आहे़धुळे शहर एकात्मिक विकास योजनेतंर्गत १०० टक्के शासन अनुदानातून मनपा मालकीच्या गट क्रमांक १४७/१४९ च्या एकूण ४़६० हेक्टर जागेत तब्बल १५ ते २० वर्षांच्या प्रशासकीय व तांत्रिक अडचणींचा सामना करीत ३० गाळयांचे बांधकाम करण्यात आले़ या कामाची अंदाजपत्रकीय किंमत १ कोटी ३४ लाख इतकी असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गेल्या वर्षभरात सातत्याने प्रयत्न सुरू होते़ मनपाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीकडूनही ट्रक टर्मिनसचा प्रस्ताव मार्गी लावल्यास मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते़ राष्ट्रीय महामार्ग ३ पासून ट्रक टर्मिनस पावेतोचे रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झालेले आहे़ शहरात दोन ते अडीच हजारावर लहान मोठे मालवाहू वाहने आहे. त्यातील १ हजार वाहने ही नेहमी बाहेर असतात. उर्वरित एक ते दीड हजार वाहने शहरात माल भरून शहरातील चाळीसगाव रोड, ऐंशीफुटीरोड, पारोळारोड, बाजार समिती परिसर, सुशी नाला पुल आदींसह जिथे माल भरला तेथे वाहने विनापरवानगी उभे केली जातात. त्यामुळे शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी असतांनाही सर्रासपणे अवजड वाहनांची ये-जा सुरू असते़ त्यामुळे मनपाने गाळयांच्या लिलावाचा निर्णय घेतला असला तरी प्रतिसादाबाबत साशंकता आहे़