लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील आदिवासी भागातील दोंडवाडीपाडा येथे रस्त्याच्या कामात सुमारे ५० लाखाचा भ्रष्टाचार झाल्याची माहिती अधिकारात उघड झाली़ चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाच सदरचा रस्ता सापडेना अशी स्थिती झाली होती.तालुक्यातील आदिवासी भागातील रामा १ ते दोंडवाडीपाडा असा २ किमीचा रस्ता तयार करण्यासाठी ५० लाखाचा निधी मंजूर झाला होता़ मात्र माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी उपविभागिय अधिकारी सा.बां. उपविभाग शिरपूर २ यांच्याकडे आरटीआईद्वारे माहिती मागवली, जी धक्कादायक आहे. त्या माहितीनुसार रामा १ ते दोंडवाडीपाडा ग्रामा ८० हा रस्ता ०/० ते २/० किमी दुरस्तीसाठी ४९ लाख ५१ हजार ८५८ रूपयांची आदिवासी उपयोजनेतून राज्य सरकारने प्रशासकिय मंजूरी दिलेली होती. मात्र ठेकेदार, बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी मिळून रस्ताच गिळंकृत करून बीलाची संपूर्ण रक्कम अदा करून घेतलेली आहे. तसा संबंधित कार्यालयाचा चौकशी अहवाल व प्रत्यक्ष एक रूपयाचेही काम न झाल्याचा पंचनामा रिपोटमध्ये म्हटल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.आदिवासी भागाच्या विकासासाठी येणारा पैसा हा तेथेच खर्च होणे अपेक्षित असतांना, संबंधित ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी मिळून रस्ताच गायब करून टाकलेला आहे. सदर मंजूर रस्त्याचे काम न करता संपूर्ण रक्कम हडप करणाºयांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून, सरकारी पैशाची वसूली करणे व सदर मंजूर रस्ता तात्काळ तयार करून द्यावा अशी मागणी बिरसा क्रांती दलाने निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे़त्या रस्त्याची चौकशीकरीता २२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एच़डी़भोसले आणि त्यांच्या पथकाने पहाणी केली़ मात्र चौकशी अधिकाºयांना तयार झालेला रस्ता दिसलाच नाही ते दुसºयाच ठिकाणी गेलेत़ त्याचवेळी बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाºयांनी त्यांच्या लक्षात आणून देत, न सापडलेल्या रस्त्याच्या प्रत्यक्षस्थळी आणले.मात्र तो रस्ता झाला नाही हे भेट दिल्यानंतर लक्षात आले़ या प्रकारानंतर चौकशी अधिकारी देखील शांत झालेत़कामाची निविदा, इस्टिमेट, वर्क आॅर्डर, क्वालिटी कंट्रोलचे प्रमाणपत्र, काम पूर्णत्वाचा दाखला, पैसा लाटल्याचे पुरावे आदी दस्तावेज हे रामा १ ते दोंडवाडीपाडा पर्यंत २ किमी रस्ता पूर्ण करण्याचे असतांना आलेले चौकशी अधिकारी दुसराच युक्तिवाद करत, दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते.मात्र बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाºयांनी चौकशी पथकावर प्रश्नांची सरबती केली. त्यावर चौकशी पथकानेउडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यावर बीकेडीने पंचनामा करण्याचा तगादा लावला, यावर कार्यकारी अभियंत्याने नकार दिला. मग हे चौकशी पथक आले तरी कशाला? असा प्रश्न दोंडवाडीपाडाचे नागरिक व बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाºयांना पडलाय. सदरील रस्ता भ्रष्टाचाराच्या विरोधात येत्या २ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी आंदोलन करणार आहेत़
तयार केलेला रस्ता अधिकाऱ्यांना सापडेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 9:04 PM