शिरपूर : गत आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात तालुक्यात विक्रमी पाऊस झाल्यामुळे सरासरीच्या २२८ टक्के पाऊसाने आतापर्यंत हजेरी लावली आहे़अद्यापही परतीचा पाऊस सुरू आहे, तसे झाल्यास ५० वर्षाचे रेकॉर्ड ब्रेक पावसाळा ठरणार आहे़ दरम्यान, करवंद, अनेर धरणासह शिरपूर पॅटर्नचे बंधारे ओव्हर फ्लो होवून ओसडूंन वाहत आहेत़तालुक्यात आॅगस्ट महिन्यापर्यंत पाऊस होवूनही धरणे कोरडीच होती़ करवंद येथील मध्यम प्रकल्पात केवळ १९़७७ टक्के तर अनेर मध्यम प्रकल्पात १९़९७ टक्के पाण्याचा साठा होता़ तसेच तालुक्यातील १३ पैकी ८ लघु प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट होता़ मात्र ९ आॅगस्ट रोजी तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे अरूणावती नदीसह अन्य नद्यांना महापूर आला़ त्या दिवशी तब्बल २०५ तर दुसऱ्या दिवशी दिवशी १०१ मिमि पाऊस झाला़ सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावली़ जून-जुलै महिन्यात पाऊस कमी झाल्यामुळे दृष्काळाला सामोरे जाण्याची वेळ आली असतांना मात्र गत दोन महिन्यात मुसळधार पाऊस झाला़ परतीच्या पावसाने बहुतांशी मंडळात जोरदार पाऊस झाल्यामुळे पिके पाण्याखाली गेली होती़ त्यामुळे मूग, उडीद, बाजरी, ज्वाारी आदी पिके मिळणाºया उत्पादनालाही जोरदार फटका बसला आहे़ पिकापासून मिळणारे उत्पन्न तर दूरच परंतु मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे चाराही निकामी होण्याच्या भीतीमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे़ १९ रोजी देखील रात्री झिमझिम पाऊस शहरासह तालुक्यात झाला़ २० रोजी देखील पावसाने हजेरी लावली़ दिवसभर वातावरण ढगाळ होते़
तालुक्यात सरासरीपेक्षा दुपटीचा पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:10 PM