शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जलद बसेस देवपूर स्थानकात नेण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:57 AM

बसची प्रतीक्षा करून कंटाळलेल्या प्रवाशांना मध्यवर्ती स्थानकात जावे लागते

ठळक मुद्देप्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केले बसस्थानकलांब पल्याच्या बसेस चालक स्थानकात नेत नाहीतमध्यप्रदेशच्या बसेसही येत नाहीत

आॅनलाइन लोकमतधुळे : प्रवाशांच्या सोयीसाठी देवपूर बसस्थानक सुरू करण्यात आलेले आहे. मात्र लांब पल्याच्या बसगाड्यांचे चालक या स्थानकात बस न नेता परस्पर नेतात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. तसेच मध्यप्रदेश परिवहनच्या बसेस या ठिकाणी येत नसल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असते. या स्थानकात शिरपूर, नंदुरबारकडे जाणाऱ्या सर्व जलद बसेस आल्या पाहिजेत अशी प्रवाशांची मागणी आहे.धुळे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. देवपूरसह नगावबारी, वलवाडी, वाडीभोकर, नेहरूनगर, विद्यानगरी व लगतच्या परिसरातील प्रवाशांना महामंडळाच्या बसने प्रवास करायचा असल्यास, जवळपास दोन-तीन किलोमीटर अंतरावरील मध्यवर्ती बसस्थानकातच यावे लागत होते. त्यामुळे देवपुरला बसस्थानक व्हावे अशी मागणी सुरू झाली. देवपूर बसस्थानक कृती समितीने यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. सहा वर्षांपूर्वी बीओटी तत्वावर येथे प्रशस्त बसस्थानक बांधण्यात आले. बसस्थानक झाल्याने, या भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.बसस्थानकाचा डोलारा मोठा असला तरी तो प्रवाशांसाठी फायदेशीर नाही. या बसस्थानकातून सकाळी ६ वाजता पहिली बस सुटते. तर शेवटची बस रात्री ९ वाजता सुटत असते. दिवसभरात या स्थानकात शेकडो बसेस येतात व जातात असे महामंडळाचे म्हणणे असले तरी प्रत्यक्षात स्थिती वेगळी असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.या बसस्थानकासमोरील मार्गावरून शिरपूर, दोंडाईचा, शिंदखेडा, नंदुरबार, शहादा, औरंगाबाद भोपाळ, उज्जैन या शहरांकडे बसेस जात असतात. साध्या तसेच ग्रामीण भागात जाणाºया बसगाड्या येथे येत असल्या तरी, जलद गाड्या या ठिकाणी न थांबता परस्पर जात असतात,अशी प्रवाशांची तक्रार आहे. प्रवाशी स्थानकातच बसची वाट पहात असतात. मात्र ती बस केव्हाच निघून गेलेली असते. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना तेथून रिक्षा भाडे खर्च करून मध्यवर्ती बसस्थानकात यावे लागते. यात वेळ आणि पैसा खर्च होतो तो निराळाच. बसस्थानकाची उभारणी प्रवाशांच्या सोयीसाठी झालेली असल्याने, त्याठिकाणी सर्व बस जातील-येतील अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.मध्यप्रदेशच्या बसेसही येत नाहीमध्यवर्ती बसस्थानकात होणारी गर्दी लक्षात घेता, इंदूरकडे जाणाºया राज्य व मध्यप्रदेशच्या बसगाड्या या देवपूर स्थानकातच थांबतील. तेथून सुटतील असे विभाग नियंत्रकांनी आदेश काढले आहेत. परंतु या स्थानकात इंदूर, उज्जैन, भोपाळकडे जाणाºया मध्यप्रदेश परिवहनच्या बसेस येतच नाही, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे. या ठिकाणाहूनही मध्यप्रदेशात जाणाºया प्रवाशांची संख्या जास्त आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी येथे मध्यप्रदेशच्या बसेस येणे गरजेचे आहे.या बसस्थानकात कोणत्या बसेस येतात, कोणत्या परस्पर जातात यावर लक्ष ठेवून स्थानकात जलद बस न आणणाºया चालकांवर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे