शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

धुळ्यात उत्कृष्ट काम करणा-या ५६ आशा कर्मचा-यांना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 5:10 PM

जिल्हा परिषद : पंचायत समितीच्या सभागृहात झाला कार्यक्रम

ठळक मुद्देजिल्ह्यातील आशा कर्मचाºयांना पुरस्कार देण्यासाठी निवड समितीने केलेली निवड ही योग्य आहे. आशा कर्मचारी जिल्ह्यात करत असलेले काम स्तुत्य आहे. त्यांना भविष्यात येणाºया अडचणी सोडविण्यासाठी पाहिजे, ती मदत केली जाईल, असे जि.प. अध्यक्ष शिवाजी दहिते यांनी येथे आश्वासित केले. पंचायत समितीच्या सभागृहात झाला कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क 

धुळे :  आशा स्वयंसेविका कर्मचाºयांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासकीय व शासकीय पातळीवर संघर्ष करावा लागतो. आशा कर्मचाºयांचे प्रलंबित प्रश्न व इतर मागण्या निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील असून त्यादृष्टीने येणाºया काळात प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांनी येथे केले. पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी दुपारी जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका पुरस्काराचे वितरण झाले. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. मंचावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, पंचायत समितीचे सभापती अनिता पाटील, उपसभापती दिनेश भदाणे, जिल्हा माता व बालसंगोपन डॉ. चारूलता पवार, गटविकास अधिकारी सी. के. माळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा आशा समन्वयक सरिता पाटील यांनी आशा कर्मचाºयांच्या समस्या येथे मांडल्या. आशा कर्मचारी गावाच्या डॉक्टर  आशा कर्मचारी या गावाच्या डॉक्टरच असतात. मात्र, त्यांच्या मागण्या निकाली काढण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत आशा कर्मचाºयांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासनाकडे नक्कीच प्रशासनामार्फत पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. जिल्ह्यातील आशा कर्मचाºयांचे कामही उत्कृष्ट सुरू असल्याचेही त्यांनी येथे सांगितले ...तर कारवाई करणार जिल्हा परिषदेत आशा कर्मचाºयांना मिळणाºया मानधनाबाबत कार्यवाही होत नसल्याची अनेकदा ओरड होत असते. त्यासाठी आता आशा कर्मचाºयांचे मानधन काढण्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र लिपीक नियुक्त केला आहे. तरीही आशा कर्मचाºयांचे मानधन निघत नसले, तर कर्मचाºयांनी तक्रार करावी, निश्चितच संबंधितावर कारवाई केली जाईल, असे आवाहन सीईओ गंगाथरन देवराजन यांनी येथे केले. 

चिमुकलीवर असलेले आईचे छत्र गेले; आशा कर्मचा-याने दिला आधार मंगळवारी आयोजित कार्यक्रमात जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका पुरस्कार समितीने निवड केलेल्या ५६ आशा कर्मचा-यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यात साक्री तालुक्यातील कुडाशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चिमा मनोज चौधरी यांना विशेष असा जिल्हास्तरीय आरोग्य सखी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कुडाशी येथील एका महिलेला जुळ्या मुली झाल्या होत्या. पैकी एक मुलीचा मृत्यू झाला. तसेच जन्मदेती आईचा देखील मृत्यू झाल्याने राहिलेल्या एका मुलीचा सांभाळ करण्यास ‘त्या’ मुलीचा सांभाळ करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत चिमा चौधरी यांनी त्या मुलीचा सांभाळ करण्यास ठरविले. ही माहिती कार्यक्रमात दिल्यानंतर सभागृहात उपस्थित अनेकांचे डोळ्यात पाणी तरळल्याचे चित्र दिसून आले. 

टॅग्स :Dhuleधुळेzpजिल्हा परिषद