पिंपळनेर : येथे जागतिक मानवाधिकार सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमातून मानवी हक्काविषयी प्रबोधन करण्यात आले.अखिल भारतीय मानवाधिकार संघ पिंपळनेर व कर्मवीर आ.मा. पाटील विद्यालयाच्या संयुक्तपणे प्रथम वर्ष या रॅलीचे आयोजन करण्यात आले. व्यक्तीला जन्मजात काही मूलभूत अधिकार व हक्क प्राप्त झालेले आहेत. त्याची जाणीव प्रत्येक व्यक्तीला व्हावी याबाबतची जनजागृती या रॅलीतून करण्यात आली. सोमवारी सकाळी नऊ वाजता कर्मवीर आ.मा. पाटील विद्यालयाच्या प्रांगणातून रॅलीचे आयोजन करण्यात आले.सुरुवातीला अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष प्रवीण थोरात व प्राचार्य ए.बी. मराठे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. ही रॅली महाविद्यालयातून सामोडे चौफुली मार्ग, बसस्थानक, गावातून मेन रोड बाजार पेठ, धनश्री ज्वेलर्स मार्ग गांधी चौक व नदी वरील लहान पुलावरून कर्मवीर आ. मा. पाटील विद्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला.रॅलीत कर्मवीर आ.मा. पाटील विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. यावेळी अखिल भारतीय मानवाधिकार संघाचे अध्यक्ष प्रवीण थोरात, प्राचार्य ए.बी. मराठे, संस्थेचे स्कूल कमिटीचे चेअरमन डॉ.विवेकानंद शिंदे व संघाचे पदाधिकारी अरुण गांगुर्डे, प्रमोद जोशी, कल्पेश टाटिया, धनंजय देवरे, दिनेश भालेराव, अनिल महाले, बाबा पेंढारकर, संभाजी शिंदे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळनेर डॉ. भूषण जोशी, आ.मा. पाटील विद्यालयाचे शिक्षक जी.व्ही. भामरे, पी.एच. पाटील व शिंपी आदी उपस्थित राहून रॅलीसाठी सहकार्य केले. रॅलीस सहकार्य करणाऱ्या सर्वांचा सत्कार करून रॅलीची सांगता करण्यात आली.
रॅलीतून मानव अधिकारांची जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:05 PM