लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खासदारांचे वाहन तोडफोड प्रकरणी अटकेत असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांना कारागृहात निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत आहे़ तरी जेवणाचा दर्जा सुधारण्यात यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे शनिवारी कारागृह अधीक्षकांकडे करण्यात आली़मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाने २२ दिवसांपासून आंदोलन पुकारले आहे़ या आंदोलनादरम्यान, खासदार डॉ़ हिना गावित यांच्या वाहनाच्या काचा अनावधानाने फुटल्याची घटना घडली होती़ त्यामुळे दाखल झालेल्या अॅट्रोसिटीच्या खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांना न्यायालयाच्या आदेशानुसार धुळे जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़ मात्र कारागृहात सकाळ, दुपार, सायंकाळ व रात्री नास्ता, जेवणाची सोय कारागृह यंत्रणा करीत असली तरी जेवणासह पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेमध्ये हलगर्जी होत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे मानवाधिकाराचा भंग होत आहे़ मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांसह अन्य आरोपींकडूनही त्याबाबत तक्रारी होत आहे़ त्यामुळे याप्रकरणी चौकशी करावी व जेवणाचा दर्जा सुधारण्यात यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हा कारागृह अधीक्षकांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली़ यावेळी मुन्ना शितोळे, संजय वाल्हे, राजाराम पाटील, राजू इंगळे, दिपक रवंदळे, समाधान शेलार, अशोक सुडके, राजू ढवळे, प्रफुल्ल माने, वसंत हराळ, गोविंद वाघ, चंद्रकांत मराठे, विरेंद्र मोरे, उमेश मराठे, सुधीर मोरे, प्रल्हाद मराठे, राजू बोरसे, संदीप सूर्यवंशी, निलेश काटे, मनोज ढवळे, सुभाष पाटील, बाळासाहेब निकम व समाजबांधव उपस्थित होते़
धुळयातील कारागृहात मराठा आंदोलकांना निकृष्ट जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 5:31 PM
चौकशीसह दर्जा सुधारण्याची क्रांती मोर्चाची मागणी
ठळक मुद्दे-कारागृह अधीक्षकांना मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन-जेवणासह पिण्याच्या पाण्याबाबत केली तक्रार-मानवाधिकाराचा भंग होत असल्याचा आरोप