शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

पोलिसांकडून कठोर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 8:36 PM

लॉकडाउनमध्ये गर्दी : लाठीचा प्रसाद अन आर्थिक भूर्दंड, आतापर्यंत 000 वाहनांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्याच्या बहाण्याचे लॉकडाउनमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांविरोधात पोलिसांनी अधिक कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे़कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे़ विनाकारण बाहेर पडू नये, सोशल डीस्टन्सिंगची मर्यादा पाळावी, घरातच थांबावे, शहरात गर्दी करु नये, असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे़ परंतु धुळेकरांनी प्रशासनाच्या या आवाहनाकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे़ गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरुवातीला पोलिसांनी आपल्या वाहनांवर असलेल्या ध्वनीक्षेपकांच्या माध्यमातून जाहीर आवाहन करीत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला़ अनेकदा पोलिसांनी भावनिक आवाहनही केले़ परंतु धुळेकरांनी त्यालाही प्रतिसाद दिला नाही़ त्यामुळे मध्यंतरी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बळाचा वापर करुन लाठीचा प्रसाद देणे सुरु केले़ त्यानंतर शहरातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले होते़ परंतु लॉकडाउनच्या तिसºया टप्प्यापासुन काही उद्योग, व्यवसाय आणि जीवनावश्यक वस्तुंसाठी शासनाने मोठी शिथीलता दिली़ शिवाय प्रवास करण्याची परवानगी दिली़ ही परवानगी आवश्यकता असणाऱ्यांसाठी होती़ परंतु धुळेकरांनी याचाही विपर्यास करीत गर्दी करायला सुरुवात केली आहे़ गेल्या दीड महिन्यांपासुन घरात असलेले नागरिक जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने पोलिसांनी देखील आपली मोहिम काहीशी शिथील केली होती़परंतु गेल्या दोन दिवसात शहरातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली आहे़ दरम्यान रविवारी राज्याचा लॉकडाउन ३१ मेपर्यंत वाढविण्यात आला आहे़ या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुन्हा एकदा कठोर कारवाई सुरु केली आहे़महानगरपालिका चौकासह शहरातील विविध चौकांमध्ये पोलिसांनी कमांडो पथकाने कारवाई करीत विनाकारण फिरणाºया आणि नियम न पाळणाºया वाहनचालकांना लाठीचा प्रसाद दिला़

टॅग्स :Dhuleधुळे