लोकमत न्यूज नेटवर्कबळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील ग्रामपंचायतीत सरपंच दरबारसिंग गिरासे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.याप्रसंगी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पथ संचलन व घुंगरू काठी प्रात्यक्षिक सादर केले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य सादरीकरण केले. तसेच मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ग्रामपंचायतीमार्फत माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेतील वैशाली कोळी व माध्यमिक विद्यालयातील रशीद पटेल यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुढीलवर्षी ग्रामपंचायतकडून विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यात आदर्श अंगणवाडी, आदर्श शिक्षक, आदर्श सेवक पुरस्कार, दहावी ते बारावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, गावातील स्वच्छ प्रभागातील विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे २१०० रुपयांचे बक्षिस व स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला १५०० रुपये व स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला ११०० रुपयांचे बक्षिस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन यांनी दिली.याप्रसंगी उपसरपंच मिराबाई खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य देविदास धनुरे, इंद्रसिंग गिरासे, ध्यानाबाई माळचे, मालिखा पठाण, जन्याबाई मासुळे, कल्पनाबाई ईशी, लिलाबाई हालोरे, रमणबाई चव्हाण, हिराबाई मोरे, धनगर, भूषण हालोरे, पोलीस पाटील आनंदा पाटील यांच्यासह प्राचार्य, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन काकुस्ते व गिरासे यांनी केले. आभार चौरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी भूपेश काटे, क्रीडाशिक्षक अहिरे आदींचे सहकार्य लाभले.
बळसाणे ग्रामपंचायतीतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 1:04 PM