लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : बँक प्रशासनाने काळजी घेत असताना सुरक्षा रक्षक नेमावे तसेच आपल्या विविध शाखांचे सुरक्षा संदर्भातील आॅडीट तातडीने करुन घ्यावे अशा सूचना पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी बैठकीतून दिल्या़ शहर वाहतूक शाखेच्या बाजुला असलेल्या मल्टिपर्पज हॉलमध्ये जिल्ह्यातील बँक अधिकाºयांची सुरक्षा संदर्भात पोलीस अधीक्षक यांनी तातडीची बैठक घेतली़ यावेळी सेंट्रल बँकेच जिल्हा व्यवस्थापक मनोजकुमार दास, अपर पोलीस अधीक्षक डॉ़ राजू भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते़ बैठकीत पोलीस अधीक्षक यांनी मार्गदर्शक अशा सूचना केल्या़ त्यात बँकेत काही विपरीत घडल्यास बँकेच्या अधिकाºयांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा़ त्यासाठी पोलीस आणि बँक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे़ दरवर्षी बँकेचे आॅडीट होत असते, त्याअनुषंगाने लवकरात लवकर सुरक्षितताबाबतचे आॅडीट करणे अनिवार्य आहे़ याकडे गांभिर्याने घेऊन त्याची अंमलबजावणी करावी़ बँकाच्या मुख्य आणि विविध शाखेत सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी़ सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्थित कार्यान्वित करण्यात यावे़ धोका निर्माण झाल्यास सायरन वाजेल याकडे तातडीने लक्ष देण्यात यावे़ आभार सचिन हिरे यांनी मानले़
बँकांनी सुरक्षाबाबतचे आॅडीट तात्काळ करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 9:07 PM