राजेंद्र शर्माधुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपतर्फे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीतर्फे बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे, अमित देशमुख, दादा भुसे या मंत्र्यांनी प्रचार सभा घेतल्याने निवडणुकीत रंगत आली आहे.धुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ५६ गट आणि ११२ गणासाठी निवडणूक होत आहे. जिल्ह्यात प्रथमच काँग्रेस, राष्टÑवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडी स्थापन झाली आहे. मात्र शिरपूर तालुक्यात काही जागांवर आघाडी झालेली नाही. बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होत आहे.नेहमीप्रमाणे चारही तालुक्यांत पारंपरिक प्रतिद्वंदी आमने - सामने आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, आता त्यांच्या खांद्यावरील पक्षाचा झेंडा बदलला आहे.यंदा भाजपतर्फे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार जयकुमार रावल यांच्यासोबत माजी आमदार अमरिशभाई पटेल, जि.प.चे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते प्रचार करीत आहे. त्यात माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे.महाविकास आघाडीत आमदार कुणाल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, राष्ट्रवादीचे संदीप बेडसे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, माजी आमदार अनिल गोटे प्रचारात उतरले आहेत.>नेतेमंडळींचे नातेवाईक रिंगणातनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण गुलाबराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांच्या पत्नी हेमांगी, माजी आमदार डी.एस. अहिरे यांचे चिरंजीव धीरज रिंगणात आहेत. भाजपतर्फे माजी जि.प. अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे चिरंजीव हर्षवर्धन, खा. डॉ. भामरे यांच्या वहिनी मंगला पाटील, भाजयुमोचे अध्यक्ष राम भदाणे रिंगणात आहेत.
धुळे जिल्हा परिषदेत आजी-माजी आमदारांसाठी अस्तित्वाची लढाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2020 5:47 AM