चंद्रकांत सोनार ।धुळे : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अंतिम टप्यात आलेली आहे. यंदाही जिल्हा परीषद अध्यक्षपदाची खुर्ची तालुक्याला मिळविण्यासाठी महाआघाडीसह भाजपने सर्वसाधारण गटात मातब्बर उमेदवार दिले आहे़ त्यामुळे गट व गणांवर वर्चस्व राखण्यासाठी नेते सरसावले आहे. दुसाने- गटात जयकुमार रावल यांचे समर्थक नारायण पाटील हे भाजपतर्फे उमेदवारी करत असून महाआघाडीचे नरेंद्र खैरनार व अपक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. बळसाणे गटात भाजपचे प्रांतिक सदस्य सुरेश पाटील यांच्या पत्नी मंगला पाटील रिंगणात आहेत. नेते आपआपल्या गटांमध्ये अडकल्याने इतर उमेदवार आपल्या हिमतीवर प्रचार करीत आहे.बंड शांत करण्यात यशपिंपळनेर गटात महाआघाडीने पक्षाने उपसरंपच विशाल गागुर्डे यांच्या पत्नी सुधा गागुर्डे यांना उमेदवारी दिली आहे़ तर भाजपने लताबाई सुरेश पाटील उमेदवारी करीत आहे़ इच्छूकांना उमेदवारी नाकारल्याने या गटात पल्लवी माळी व प्रतिभा गुरव हे अपक्ष उमेदवारी करीत होते़ मात्र महाआघाडीच्या नेत्याकडून आश्वासन मिळाल्याने दोन्ही अपक्ष उमेदवारांनी प्रचार थांबवून महाआघाडीचे उमेदवार सुधा गागुर्डे यांचा प्रचार करीत आहे़ या गटात मतांच्या विभाजनाचा महाआघाडीला फटका बसणारा होतो़ मात्र बंडशांत करण्यात यश आल्याने निवडणूकीत उमेदवारांना विजयाचा मार्ग सुकर झाला आहे़महाआघाडी व भाजपाचा सामनाशिरपूर व साक्री तालुक्यात आदिवासी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ तर महाआघाडीच्या विद्यमान आमदार मंजूळा गावीत यांच्यासह काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाचे माजी खासदार बापू चौरे, माजी आमदार योगेश भोये, माजी आमदार डी़ एस़ आहिरे, माजी आमदार वसंत सुर्यवंशी यांच्याकडून आदिवासी बहूल गावात प्रचाराला भर दिला जात आहे़सत्तास्थापनेसाठी भाजपाचे लक्षजिल्हा परिषदेच अध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण आहे. निजामपूर गट सर्वसाधारण असल्याने या गटाकडे भाजपासह महाआघाडीकडून प्रचार-प्रसाराला जोर दिला आहे़ या गटात जि़ प़ माजी अध्यक्ष शिवाजी दहिते यांचे पुत्र हर्षवर्धन दहीते पहिल्यांदा भाजपाकडून उमेदवारी करीत आहे़ तर शिवसेनेकडून मिलिंद भार्गव यांना उमेदवारी दिली आहे़पुत्रपे्रमासाठी एकत्रसामोडे गटातून माजी आमदार डी़ एस़ आहिरे यांचे पुत्र धिरज आहिरे निवडणूकीच्या रिंणगात आहे़ दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत माजी आमदार आहिरे यांच्या विरोधात निवडून आलेल्या साक्रीच्या आमदार मंजूळा गावीत यांनी धीरज आहिरे यांच्या प्रचाराचे नारळ फोडले़ आघाडी धर्म व पुत्र प्रेमापोटी गावीत व आहिरे कुटूंब निवडणूकीचा प्रचार एकत्र करीत आहे़जिल्हाधिकाऱ्यांचे बंधू रिंगणातनंदूरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूडे मुळगाव सामोडे आहे़ या गावातून त्यांचे बंधू दिपक भारूडे भाजपाकडून तर माजी खासदार चौरे यांचे सुपूत्र प्रविण चौरे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी करीत आहे़ भारूडे यांच्या आई २५ वर्षापासून सरपंच तर पत्नी विद्यमान ग्रा़प़ सदस्या आहेत़ निवडणूकीच्या रिंगणात पहिल्यांदाच उतरलेले उमेदवार तरूण आहेत़ एका उमेदवाराचे नेतृव माजी जि़प़अध्यक्ष दहिते तर दुसºयाचे ोतृत्व माजी खासदार चौरे करीत आहे़ त्यामुळे दोन्ही तरूण उमेदवारांच्या निवडीकडे सर्वाचे लक्ष लागून आहे़साक्री तालुक्यात घराणेशाही रिंगणात४निजामपूर गटातून जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे सुपुत्र हर्षवर्धन दहिते हे प्रथमच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे़४धुळे मनपाच्या विद्यमान नगरसेविका वंदना भामरे यांचे पती संजय भामरे अपक्ष निवडणूक लढवित आहेत़४साक्रीचे माजी आमदार डी़ एस़ आहिरे यांचे चिरंजीव धिरज आहिरे कुडाशी गटातून निवडणूकीच्या रिंंगणात आहे़४सामोडे गटातून काँग्रेस पक्षाचे माजी खासदार बापू चौरे यांचे चिरंजीव प्रविण चौरे निवडणूक लढवित आहे़४भाजपाचे मोहन सुर्यंवंशी यांच्या पत्नी लताबाई सुर्यंवशी जैताणे गटातून निवडणूकीच्या रिंगणात उभ्या आहेत़जिल्हा परिषदेचे असे आहेत गट-गण...तालुक्यातील अनेक गणांमध्ये छडवेल, जैताणे, दुसाणे, बळसाणे, निजामपूर, बुरझळ, दहिवेल, चौपाळे, पिंपळगाव, कुडाशी, सुकापूर, पिंपळनेर, सामोडे, शेलबारी, कासारे, भाडणे तसेच म्हसदी असे १७ गट व गणात समोरासमोर लढती होणार आहे. यात काही गटात विद्यमान आमदार व आजी-माजी मंत्र्याचे सुपूत्र निवडणूकीच्या रिंणगात उभे आहेत़हॉटेल-ढाब्यावर पार्ट्यांना गर्दी४प्रचार संपृष्ठात येण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत़ त्यामुळे राजकीय पक्षाच्या सभा, प्रचार दौऱ्यांवर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे़ सकाळी नऊ ते पाच ग्रामीण भागातील नागरिक शेतात जात असल्याने, नऊपूर्वी व सायंकाळी सहा नंतरच उमेदवार मतदारांच्या भेटी घेण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान हॉटेल-ढाब्यावर कार्यकर्त्यांना जेवढण्यासाठी निमंत्रित केले जात आहे़ त्यामुळे हॉटेलवर गर्दी पहावयास मिळत आहे़
ंंअध्यक्षपदासाठी सुरु सर्वांचा खटाटोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 10:46 PM
महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये लढत । बंड शांत करण्यात मिळाले महाआघाडीला यश
ठळक मुद्देमहाआघाडी व भाजपाचा सामनाबंड शांत करण्यात यशमहाआघाडी व भाजपाचा सामनाहॉटेल-ढाब्यावर पार्ट्यांना गर्दीसत्तास्थापनेसाठी भाजपाचे लक्ष