आॅनलाईन लोकमत
शिंदखेडा,दि.९ : शेतकºयांच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी शिवसेनेतर्फे गेल्या तीन दिवसांपासून पुकारण्यात आलेले जलआंदोलन शुक्रवारी सकाळी दहा वाजता मागे घेण्यात आले. प्रांताधिकारी नितीन गावंडे यांनी आंदोलनकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी भेट घेतली. त्यांना शेतकºयांचे मागण्या जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत पोहचवू, असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, उपतालुका प्रमुख राजू रगडे, युवा सेनेचे तालुका प्रमुख मयूर निकम, गणेश भदाणे, कल्याण बागल, शैलेश सोनार, राकेश गिरासे, चेतन राजपूत, बबलू कोळी, योगेश सोनवणे, बापू आखडमल, भूषण सोनवणे, जगदीश शिरसाठ, गंगाराम शिरसाठ, कैलास शिरसाठ, विलास ईशी, देवराम आखडमल, भाऊसाहेब शिरसाठ, कन्हैय्या वाकडे, अनिल वाकडे, बाळकृष्ण वाकडे, मयूर सोनवणे, दयाराम चव्हाण सहभागी झाले होते. गुरुवारी आंदोलनकर्ते राजू रघडे याची प्रकृती खालवल्याने ग्रामस्थ व शिवसैनिकांनी त्यांना उपग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. जोपर्यंत शेतकºयांचे प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला होता. त्याची दखल घेऊन प्रांताधिकारी गावंडे यांनी आज आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.