कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, प्राचार्य डॉ. पी.एस. सोनवणे, प्राचार्य डॉ. ए.पी. खैरनार, प्राचार्य डॉ. एस. टी. सोनवणे, पी.झेड. कुवर उपस्थित होते.
डॉ. विक्रांत खैरनार पुढे म्हणाले की, या महामारीच्या काळात घाबरून न जाता भावना, बुद्धी आणि कृतीला सतर्क ठेवून आपली उत्पादकता वाढवणे. एकीकडे जास्तच घाबरून जाणे व दुसरीकडे अतिसहजपणे घेणे या दोन्ही प्रवृत्ती घातक आहेत. त्या कोरोना पसरविण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. कोरोना आजाराला समस्यांऐवजी आव्हान म्हणून स्वीकारत सर्वांनी आपले मानसिक आरोग्य जोपासावे, असादेखील सल्ला त्यांनी याप्रसंगी दिला.
डॉ. पंकजकुमार नन्नवरे म्हणाले, कोरोनाने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक नुकसानाबरोबरच मानवाच्या मानसिक आरोग्यावर केलेला आघात भयावह आहे.
प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी हातावरचे विषाणू घालवण्यासाठी आपण प्रयत्न करतो; परंतु मनावरील विषाणू नामशेष करण्यासाठी डॉ. विक्रांत खैरनार यांनी केलेले मार्गदर्शन महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादित केले. कोरोना विषाणूचा समूळ नायनाट करण्यासाठी लसीकरण, सामाजिक अंतर, शारीरिक सुरक्षासोबतच मानसिक आरोग्य सुदृढ ठेवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. पी. एस. सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक रासेयोचे विभागीय समन्वयक व कार्यशाळेचे आयोजक डॉ. सचिन नांद्रे यांनी केले. सूत्रसंचालन कार्यशाळा समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले. कार्यक्रमा यशस्वीतेसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. विश्वास भामरे, डॉ. जगदीश पाटील, प्रा. सी. एन. घरटे, डॉ. रमेश आहिरे, प्रा. प्रणव गरुड, प्रा. शरद सोनवणे यांनी तसेच स्थानिक आयोजन समितीचे डॉ. लहू पवार, डॉ. सुरेश सोनवणे, डॉ. ज्योती वाकोडे, डॉ. दीपक नगराळे, डॉ.हसीनखां तडवी यांनी प्रयत्न केले.