धुळे : आदिवासी बांधवांचा लोकप्रिय भोंगऱ्या उत्सवाला मंगळवारपासून आंबे-सुळे गावापासून सुरुवात होत आहे. होळी पूजनासाठी पूजासाहित्य खरेदीसाठी भरणाऱ्या भोंगऱ्या बाजारात आदिवासी वाद्य, आदिवासी पेहराव, नृत्याचे सांस्कृतिक दर्शनही घडते. दरम्यान, रोजगारासाठी बाहेर गेलेले आदिवासी बांधव यानिमित्ताने स्वगृही परतू लागले आहेत. सातपुडा पर्वत शृंखलेतील आदिवासींचा होळी हा प्रमुख सण आहे. मात्र होळीपूर्वी आठवडाभर चालणारा भोंगऱ्या हाट विशेष आकर्षण ठरतो.
असा भरेल भोंगऱ्या हाट२८ रोजी मंगळवार आंबे व सुळ,१ मार्च रोजी पनाखेड, दहिवद, कोडीद, २ रोजी बोराडी, लाकड्या हनुमान, ३ रोजी सांगवी, वरला (एमपी), ४ रोजी पळासनेर, भोईटी,५ रोजी रोहिणी, हाडाखेड, असा भरेल गावांमध्ये मेलादा ७ रोजी चोंदीपाडा, ८ रोजी दुर्बड्या, हिगाव, ९ रोजी शेमल्या, १२ रोजी वडेल खुर्द (वरला) होळी हा सण आदिवासींचा महत्त्वाचा सण असून आदिवासींच्या संस्कृतीचे दर्शन त्यांच्या सण व उत्सवातून घडते. शिरपूर तालुक्यात सातपुड्याच्या कुशीत ७० गावे व पाड्यांमध्ये आदिवासी पावरा लोक वास्तव्य करून राहतात. या आदिवासी लोकांनी आपल्या आदिवासी संस्कृतीची जोपासना केली आहे. भोंगऱ्या व मेलादा या अनुषंगाने येणाऱ्या सणांनादेखील आदिवासी महत्त्व देत असतात.