शिरपूर : आदिवासी बांधवांसाठी पर्वणी असलेल्या भोंगऱ्या बाजाराला उत्साहात सुरूवात झाली आहे़ तालुक्यातील रोहिणी येथे रविवारी तिसरा उत्सव असल्यामुळे आदिवासी बांधवांनी अलोट गर्दी केली होती़ यानिमित्त सातपुड्याच्या पर्वत रांगामधील लहानशा पाड्यातून आलेल्या आदिवासी बांधवांनी लोकगीत गायन, बासरी व ढोलचा निनाद करत सर्वांचे लक्ष वेधले.१७ रोजी रोहिणी गावाचा आठवडा बाजाराचा दिवस होता. याशिवाय मध्यप्रदेशातील सेंधवा, पानसेमल, बडवानी, चेरवी, पोखल्या व इंद्रपूर येथेही भोंगºया उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला़ यानिमित्ताने आदिवासी पाड्यांमधून आलेल्या उत्सवप्रिय आदिवासी युवक-युवतींनी बाजारात चांगलीच धमाल केली. आदिवासी तरुणांमधील उत्साहातून संस्कृतीचे दर्शन घडले़रोहिणी व सेंधवा येथील आयोजित भोंगºया बाजारात काही आदिवासी बांधवांनी पारंपारिक कलाविष्कार सादर करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले.रोहिणी येथे हातात घुंगरू धरून आदिवासी तरुणांनी नृत्याविष्कार केला. रविवारी झालेल्या या भोंगºया बाजारात लाखो रुपयांची उलाढाल झाली.रोहिणी येथील बाजारासाठी रोहिणी, भोईटी, खामखेडा, हिगांव, हिवरखेडा, मोरचिड, हातेड, बोमल्यापाडा, बोरमळीपाडा, खंबाळे, धवळीविहिर, अंजनपाडा, भिलाटपाडा, जोयदा, लाकड्या हनुमान, महादेव दोंदवाडा, पनाखेड, खैरखुटी, कोळशापाणी, जामन्यापाडा, मध्यप्रदेशातील सोलन-मालन, बिजासन, वरला आदी गावातील पावरा समाजाच्या स्त्री-पुरूषांनी हजेरी लावली़ सेंधवा तालुक्यातील सरहद्दीवरील आदिवासींनी देखील हजेरी लावल्यामुळे किमान ८ ते १० हजारापर्यंत नागरिकांची गर्दी झाली होती़सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यातील काही आदिवासींनी सोबत बासरी, मोठ्या आकाराचा ढोल, तीरकामठा, कास्याची गिरमी, बासरी आदी साहित्य सोबत आणले होते. यावेळी काहींनी अतिशय सुरेल आवाजात बासरी वाजवून ग्रामस्थांना मंत्रमुग्ध केले. तसेच त्यांनी पारंपरिक आदिवासी गितांसह हिंदी चित्रपटातील गितांचे सूर बासरीद्वारे वाजविले.
लोकगीतांसह बासरीचे गुंजले सूररोहिणी व सेंधवा येथे ‘भोंगऱ्या’ बाजार जल्लोषात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:20 PM