लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : तालुक्यातील आंबे येथे डोंगरी विकास योजने अंतर्गत १२ लाख रूपये खर्चाचे मानव केंद्र सत्संग सभामंडपाचे भूमिपूजन आमदार काशिराम पावरा व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आला़सुरुवातीस संत कृपालसिंह महाराज, संत ठाकरसिंह महाराज, संत बलजितसिंह महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन आमदार काशिराम पावरा व प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात येवून अभिवादन करण्यात आले. यानंतर आमदार काशिराम पावरा व प्रियदर्शिनी सूतगिरणी चेअरमन भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते विधीवत पूजा करून सत्संग हॉलचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, प्रचारक किरण दिदी, दहिवद मानव केंद्राचे अनेक सेवेकरी बांधव, सत्संगी परिवारातील अनेक भाविक, जयवंत पाडवी, माजी उपनगराध्यक्ष गोकुळसिंग राजपूत, माजी जि.प.सदस्य कान्हा चारण, सांगवीचे योगेश बादल, माजी पं.स. उपसभापती जगन पावरा, सरपंच कृष्णा पावरा, किशोर राजपूत, मनिष पंजाबी, विजय चौधरी तसेच परिसरातील विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. दहिवद मानव केंद्राच्या प्रचारक किरण दिदी यांनी सर्व उपस्थित भाविक बंधू भगिनींना अतिशय सुमधूर वाणीतून प्रभावी असे प्रवचन केले.
आंबे येथे मानव केंद्र सत्संग सभामंडपाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 5:33 PM