ठळक मुद्देपोलीस प्रशासनाकडून उपक्रमनाशिक शहर पोलिसांचा पुढाकारआरोग्यासाठी फलदायी
लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सुरक्षित वाहतूक आणि आरोग्यासाठी सायकल किती उपयुक्त आहे, असा संदेश देत नाशिक येथील १२ सायकल पटूंनी १ हजार ६०० किमी अंतराची सायकल परिक्रमा सुरु केली आहे़ नाशिक येथून निघालेली ही रॅली शुक्रवारी सकाळी जळगावकडे मार्गस्थ झाली़ नाशिक शहर पोलीस आणि एअरफोर्स स्टेशन देवळाली यांच्यातर्फे निघालेली ही सायकल रॅली नाशिक, धुळे, जळगाव, वाशिम, शिर्डी, नाशिक या मार्गाने फिरणार आहे़ गुरुवारी या रॅलीचे स्वागत पोलीस अधीक्षक व पथकाने केले़ शुक्रवारी सकाळी ही रॅली जळगावकडे रवाना झाल्यानंतर शुभेच्छा देण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़