लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री: तालुक्यातील म्हसाळे येथील गुरूदत्त माध्यमिक विद्यालया तर्फे हरित सेने अंतर्गत गावापासून एक किलोमीटर अंतरावरील सामाजिक वनीकरण विभाग आमोदे परिसरात बीजारोपण करण्यात आले. या बीजारोपण कार्यक्रमांतर्गत कडूनिंब, गुलमोहर, सीताफळ, जांभूळ, चिंच, अशा विविध प्रजातीच्या वृक्षांच्या बिया संकलित करून त्यांचा या बीजारोपणासाठी वापर करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय हरितसेना संघटक वसंत पटेल यांनी बीजारोपणाचे फायदे या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या प्रसंगी मुख्याध्यापक देविदास हिरे, सुनील बागुल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने या उपक्रमात सहभाग घेतला़
आमोदे परिसरात बिजारोपण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 5:18 PM