ऑनलाईन लोकमत
धुळे ,दि 1 : शेतक:यांनी पुकारलेल्या संपाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पिंपळनेर येथे शेतकरी संघटनेने भाजीबाजार, फळविक्री, कांदा बाजार बंद पाडले. तर कापडणे येथे महामार्गावर देवभाने फाटा येथे रास्तारोको करून दुधाचे टॅँकर अडवून दूध रस्त्यावर सांडले. भाजीपाल्याचे ट्रक अडविले.
पिंपळनेर येथे सकाळी शेतकरी संघटनेने शहरातील भाजीबाजार, फळबाजार बंद पाडले. तसेच उपबाजार समितीतील कांदा बाजारही बंद करण्यात आला. यावेळी शेतकरी व व्यावसायिकांमध्ये शाब्दीक चकमक उडाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
साक्री तालुक्यातील बाजार समिती व उपबाजार समित्या शेतक:यांनी बंद पाडल्या आहेत. साक्री तालुक्यातील सर्व दूध डेअ:या बंद करण्यात आल्या. विटाई येथील तीन दूध डेअ:या 1970 नंतर प्रथमच बंद करण्यात आल्या आहेत. साक्री शहरातील भाजी बाजारही बंद करण्यात आला.
धुळे तालुक्यातील कापडणे येथील शेतक:यांनी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील देवभाने फाटय़ावर येऊन रास्तारोको केला. यावेळी भाजीपाला नेणारी वाहने, दूधाचे तीन टॅँकर अडविले. तसेच परिसरातील तीन दूध संकलन केंद्रांवरील दुधाने भरलेल्या सर्व कॅन्स रस्त्यावर ओतून रिकाम्या करण्यात आल्या. दूध गोळा करणा:या वाहनांचे टायर पंर करण्यात आले. दूध संकलन केंद्रांना कुलूप ठोकण्यात आले.
कृषी सेवा बंद
शेतकरी संपामध्ये कृषी सेवा केंद्र सहभागी असल्याने त्यांनीही आज सर्व व्यवहार बंद ठेवले आहेत. ज्यांनी दुकाने उघडली त्यांच्या दुकानातू शेतक:यांनी बियाणे मोफत न्यावे, असा फतवा कृषी सेवा केंद्र चालकांनी काढला आहे.
शिंदखेडा- येथील भाजीपाला लिलाव सकाळी 6 वाजता सुरळीत झाला. दूध विक्रेत्यांनी दूध वाटप केले. भाजीपाल्याचे भाव ‘जैसे थे’ आहेत.