धुळे : धुळेजिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या चारही तालुक्याच्या पंचायत समिती निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. यात जिल्हा परिषदेच्या ५६ पैकी ३९ जागांवर विजय मिळवित भाजपने प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवित सत्ता परिवर्तन केले आहे. याठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता होती. अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग अयशस्वी झाला. गेल्यावेळी ३० जागा जिंकणाºया कॉँग्रेसला अवघ्या सात जागांवरच समाधान मानावे लागले.धुळे जिल्हा परिषदेच्या ५६ गट व ११२ गणांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, अर्ज माघारीपर्यंत शिरपूर तालुक्यातील वाघाडी, कोडीद, रोहिणी, पळासनेर तसेच धुळे तालुक्यातील लामकानी हे पाच गट व वाघाडी, वाडी बुदु्रक (ता. शिरपूर) व धाडणे (ता. साक्री) हे तीन गण बिनविरोध झाले होते. या आठही जागा भाजपने जिंकल्या होत्या.५१ गट व १०९ गणासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक ३९ जागांवर विजय मिळवित भाजपने जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळविली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत शिरपूर तालुक्यात कॉँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेनेला एकही जागा जिंकता आलेले नाही. येथे सर्व १४ जागांवर भाजपने विजय मिळविला आहे.दरम्यान या निवडणुकीत कॉँग्रेस, राष्टÑवादीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.।तीन पंचायत समित्या भाजपकडेधुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री पंचायत समितींसाठीही निवडणूक झाली होती. यापैकी धुळे, शिरपूर व शिंदखेडा पंचायत समितीवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले. साक्रीत अपक्षांवरच सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे.।पक्षीय बलाबलएकूणजागा - ५६भाजप - ३९काँग्रेस - ०७शिवसेना - ०४राष्ट्रवादी - ०३अपक्ष - ०३
धुळे जिल्ह्यात भाजपाचे वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 4:13 AM