लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आले असून ते सर्वांसाठी खुले झाले आहे़ त्यानुसार सर्वाधिक गुन्हे भाजपचे उमेदवार देवेंद्र सोनार यांच्यावर दाखल असून भाजपचे उमेदवार शितल नवले हे सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत़ मतदारांना उत्सुकतामनपा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांवरील दाखल गुन्ह्यांसह त्यांच्या संपत्तीबाबत मतदारांना उत्सुकता लागून आहे़ दरम्यान, प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाºयांना त्यांच्याकडे असलेल्या प्रभागांमधील उमेदवारांचे शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले होते़ त्यानुसार उमेदवारांनी शपथपत्रात आपल्यावर दाखल गुन्ह्यांसह संपत्तीचा तपशिल सादर केला आहे़ त्यात स्थावर, जंगम मालमत्तेच्या तपशिल, दागिने, रोकड अशा सर्व मालमत्तेचा समावेश असून कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्नही दर्शविण्यात आले आहे़काही प्रभागांची माहिती नाहीप्रभाग क्रमांक ३, ४ व ५ आणि प्रभाग क्रमांक १२, १३, १९ मधील उमेदवारांची शपथपत्रे निवडणूक निर्णय अधिकाºयांकडून संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली नाही़ त्याव्यतिरीक्त उर्वरीत प्रभागांमधील उमेदवारांची शपथपत्रे अपलोड करण्यात आलेली असली तरी त्यात काही उमेदवारांच्या शपथपत्राचा तपशिल नसल्याचे दिसत आहे़ बहूतांश उमेदवार केवळ पाचवी, दहावी व बारावीच शिकले असल्याचे देखील शपथपत्रात समोर आले आहे़ त्यात अनेक दिग्गज उमेदवारांचाही समावेश आहे़ मतदान केंद्रांसमोर लागणार ‘बॅनर्स’यंदा राज्य निवडणूक आयोगाने शपथपत्राचा नमुना बदलल्यामुळे मनपा निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांना स्वत:सह कुटूंबाच्या संपत्तीचे विवरण तसेच दाखल गुन्ह्यांचा तपशिल सादर करणे बंधनकारक असून दाखल गुन्ह्यांच्या तपशिलाचे बॅनर्स मतदान केंद्रांबाहेरही लावले जाणार आहेत़देवा सोनारवर सर्वाधिक १० गुन्हे़ भाजपचे प्रभाग १० ड मधील उमेदवार देवेंद्र चंद्रकांत सोनार यांच्यावर सर्वाधिक १० गुन्हे दाखल आहेत़ त्या खालोखाल भाजपचे प्रभाग ९ क मधील चंद्रकांत मधुकर सोनार यांच्याविरूध्द ५ गुन्हे दाखल आहेत़ तिसºया क्रमांकावर शिवसेनेचे प्रभाग ७ ड मधील उमेदवार नरेंद्र गोटू परदेशी हे असून त्यांच्याविरूध्द ३ गुन्हे दाखल आहेत़ तर भाजपच्या उमेदवार मायादेवी परदेशी, शिवसेनेचे सिध्दार्थ करनकाळ, भाजपचे अमोल मासुळे यांच्याविरूध्द प्रत्येकी दोन गुन्हे दाखल आहेत़श्रीमंतीत भाजपचे ‘टॉप फाईव्ह’ उमेदवाऱ़ सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये भाजपचे प्रभाग १७ ड मधील उमेदवार शितल मोहन नवले हे आहे़ त्यांची कुटूंबासह एकूण स्थावर, जंगम मालमत्ता तब्बल २० कोटी ६१ लाख ८० हजार ६२४ इतकी आहे़ त्याखालोखाल प्रभाग क्रमांक ७ ड मधील भाजपचे उमेदवार हर्षकुमार रेलन यांची कुटूंबासह एकूण संपत्ती ९ कोटी ८० हजार ४०९ इतकी आहे़ तिसºया क्रमांकावर भाजपचे प्रभाग १ क मधील उमेदवार नरेंद्र रूपला चौधरी हे असून त्यांची संपत्ती ६ कोटी २७ लाख ७६ हजार ८६६ इतकी आहे चौथ्या क्रमांकावर भाजपच्या प्रभाग १ अ मधील उमेदवार वंदना संजय भामरे या असून त्यांची संपत्ती ४ कोटी ८० लाख ५४ हजार ८६६ इतकी आहे़ पाचव्या क्रमांकावर भाजपच्या प्रभाग १८ क मधील उमेदवार सारीका प्रविण अग्रवाल यांचा क्रम लागत असून त्यांची संपत्ती ३ कोटी ३३ लाख ६२ हजार इतकी आहे
श्रीमंतीत भाजपचे ‘टॉप फाईव्ह’ उमेदवार आहेत़ तेजस अनिल गोटे, लोकसंग्राम (१ कोटी २९ लाख ३० हजार ८००), किरण राकेश कुलेवार, भाजप (१ कोटी २१ लाख ९ हजार २२३), नरेंद्र गोटू परदेशी, शिवसेना (१ कोटी ८ लाख ६९ हजार १३०), मयुर दिलीप कंड्रे, भाजप (१ कोटी ४३ लाख ७५ हजार ८५३), गुलाब जंगलू माळी, शिवसेना (१ कोटी २३ लाख ६ हजार ५५०), सुरेखा चंद्रकांत उगले, भाजप (१ कोटी ६२ लाख ३४ हजार ५००) हे उमेदवार देखील कोट्यधीश आहेत़