शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

धुळे महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदी भाजपाच्या बालीबेन मंडोरे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:30 PM

सभापती निवड प्रक्रिया : पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, सौम्य लाठीचार्ज

ठळक मुद्देस्थायी समितीवर भाजपाचे वर्चस्वनिवड प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी पोलिसांचा सौम्य लाठीचार्जपोलिसांचा बंदोबस्त कायम, हितचिंतकांची महापालिकेत गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका बालिबेन मंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला़ त्यांना ८ मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कमलेश देवरे यांना ७ मते मिळाली़ अवघ्या एका मताने विजयाची माळ मंडोरे यांच्या गळ्यात पडली़ फटक्यांची आतषबाजी करण्यात आली़ शिवसेनेच्या नगरसेविका ज्योत्स्रा पाटील यांची अनुपस्थिती होती़ दरम्यान, निवड प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला़ पत्रकारांना वृत्तसंकलनासाठी सभागृहात मज्जाव करण्यात आला होता़ महापालिकेत स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती निवड प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी नगरसेवकांना घेवून येणाºया वाहनाला अडविण्यात आले़ परिस्थिती हाताबाहेर जाण्यापुर्वीच पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली़ या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त कायम आहे़ येथील महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रियेला शुक्रवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरुवात होण्यापुर्वी हितचिंतकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली़ सभापती पदाकडे सर्वांचे लक्ष असल्याने आणि नगरसेवकांचा पळवा-पळवी होऊ शकते असा अंदाज असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता़ प्रक्रिया सुरु होण्यापुर्वी समाजवादी पार्टीच्या नगरसेविका शेख फातमा शेख गुलाब हे वाहनाने दाखल झाल्या़ त्यावेळी समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली़ यावेळी अन्य कार्यकर्त्यांची गर्दी होत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जावू नये यासाठी पोलिसांनी सुरुवातीला जमा होत असलेली गर्दी हटविली़ तरीही काहीही फरक पडत नसल्याने शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला़ सौम्य लाठीचार्ज केल्यामुळे धावपळ उडाली होती़ घटनास्थळी स्वत: अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, धुळे शहर पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तैनात होता़.