लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील साहेबराव वाघ हे पांझरा नदीच्या पाण्यात शुक्रवारी दुपारी वाहून गेले होते़ त्यांचा मृतदेह गावालगतच्या छोट्या बंधाºयाजवळ शनिवारी सकाळी आढळून आला़ पांझरा नदीला आलेला पूर पाहत असताना अचानक तोल गेल्याने एक जण बेपत्ता झाल्याची घटना धुळे तालुक्यातील न्याहळोद गावालगत शुक्रवारी दुपारी घडली़ सायंकाळी उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक मात्र पोहचलेले नव्हते़ त्यांचा शोध सुरुच होता़ धुळे तालुक्यातील न्याहळोद गावालगत पांझरा नदी किनारी महादेवाचे मंदिर आहे़ सध्या पांझरा नदीला पूर आलेला असल्याने ग्रामस्थ पूर पाहण्यासाठी महादेव मंदिराजवळ उभे होते़ अशातच तोल गेल्याने साहेबराव डोंगर वाघ (४८) हे पांझरा नदीत पडले़ त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला़ पण, तो अयशस्वी ठरला़ ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली़ या वेळी ग्रामस्थाांनी आरडा ओरडा केला़ पण पट्टीचा पोहणारा कुणी नसल्याने त्यांना वाचवता आलेले नाही़ अखेर सर्वांच्या डोळ्यादेखत साहेबराव वाघ हे पाण्यात वाहून गेले. त्यानंतर ग्रामस्थांनी कौठळ बंधाºयापर्यंत शोध घेतला होता़ पण, साहेबराव मात्र सापडले नाही़ त्यांचा शोध सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होता़ शनिवारी सकाळी न्याहळोद गावालगतच्या बंधाºयाजवळ साहेबराव वाघ यांचा मृतदेह आढळून आला़ शवविच्छेदन करण्यासाठी त्यांच्या मृतदेह पाठविण्यात आला आहे़ पोलिसांनी पंचनामा केला आहे़ गावात शोककळा पसरली आहे़
साहेबराव वाघ यांचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:33 PM
न्याहळोद : पुराच्या पाण्यात वाहिल्याची घटना
ठळक मुद्देधुळे तालुक्यातील न्याहळोद येथील घटना़पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे घडली दुर्घटना़सोनगीर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदऩमृतदेह आढळल्यानंतर नदी किनारी बघ्यांची एकच गर्दी झाली होती.