राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेचीदेखील पूर्वसूचना आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स तातडीने गठित करण्याचे आदेशदेखील जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. केवळ बालकांसाठी नवीन रुग्णालये, कोविड सेंटर्स, बेडची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, एनआयसीयूमधील बेड्स यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करणार असले तरी नागरिकांनीदेखील आपल्या बालकांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालकांनी जर मनावर घेतले तर ते तिसरी लाट रोखू शकतात, असेच बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तिसऱ्या लाटेचा प्रभाव रोखण्यासाठी मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:27 AM