लोकमत न्यूज नेटवर्कन्याहळोद : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील पथकाने धुळे तालुक्यातील न्याहळोद गावात येऊन गावठी दारू अड्ड्यांवर शनिवारी सायंकाळी अचानक धाड टाकली. यात शेकडो लीटर दारु, रासायनिक पदार्थ नष्ट करण्यात आले़ दरम्यान, या कारवाईत ८० ते ९० ड्रम दारु नष्ट करण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत एक लाखांपर्यंत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले़ धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील पांझरा नदी काठी अनेक दारूअड्डे राजरोस चालू होते. त्यामुळे गावात अनेकवेळा वादही झाले आहेत़ गावातील युवकांना दारू बंद झालीच पाहिजे असे वाटत होते. पण, यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलले जात नव्हते. दारुबंदीच्या कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांच्या नेतृत्वात नाशिक विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. यात नदी किनारी असलेले दारुचे अड्डे, ड्रममध्ये ठेवण्यात आलेली दारु व ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य नष्ट करण्यात पथकाला यश मिळाले. त्यामुळे न्याहळोदपासून विश्वनाथ गावापर्यंत नदीकिनारी दारूचा घमघमाट पसरला होता. या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे़ अशा प्रकारची कारवाई वारंवार करण्याची मागणी यावेळी करण्यात आली़ ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क नाशिकचे दुय्यम निरीक्षक डी़ के़ क्षीरसागर, अधीक्षक मनोहर अंचुळे, डी़ एस़ महाडीक, बी़ आऱ नवले, एस़ आऱ नवले, ए़ एच़ सूर्यवंशी, आय़ एऩ वाघ व गीतांजली कोळी यांनी केली़ दरम्यान, गावातील या अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती़ दरम्यान, दारुबंदीच्या कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ही मोठी कारवाई करण्यात आली.
न्याहळोदला गावठी दारु नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 10:22 PM