धुळे : लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्याने अक्कलपाडा, नगरोथ्थानसह पालिकेच्या विविध विकास कामांना बे्रक लागला आहे़ त्यामुळे महापालिकेचे सुमारे दहा कोंटीची विकास कामे थांबली आहेत़२६ रस्त्यांचा प्रस्तावनगरोत्थान अंतर्गत सुमारे ९२ रस्त्यांसाठी २०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, आचारसंहितेमुळे या कामांना बे्रक लागला आहे़ भाजपाची सत्ता स्थापनेनंतर राज्य शासनाने सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ यामध्ये नगरोत्थान योजनेतून कामे केली जाणार आहे़ २६ रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तांत्रिक मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता़ मात्र त्यापुर्वीच आचारसंहिता लागु झाल्याने ही कामे होऊ शकली नाही़तीन विषयांना स्थगिती़महापालिकेची स्थायी समितीची बैठक २५ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती़ यावेळी विषय प्रत्रिकेवर २७ विषयांचा समावेश करण्यात आला होता़ आचारसंहिता लागल्यास महापालिकेची विकास कामे थांबू नये, यासाठी प्रशासनाकडून नियोजन देखील करण्यात आले होते़तांत्रिक अडचणीअभावी विषय क्रमाकं १९ वाडीभोकररोड ते पिरबाबा दर्गा ते भिवसननगर ते पाटील नगर, सुदर्शन नगर ते नकाणेरोडपर्यंत रस्ता डांबरीकरण, गटारी या कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली होती़ तर विषय क्रमांक २० देवपूरातील साईबाबा मंगल कार्यालय ते रूपामाई शाळा ते योगिता प्रोव्हिजन घरासमोरील डांबरीकरण, गटारीची कामांचा समावेश होता़ विषय क्रमांक २१ मध्ये गोंदूररोड ते परिवहन कॉलनी, ते साने गुरूजी कॉलनी ते योगिता प्रोव्हिजन रस्त्यापर्यत डांबरीकरण अशी विविध विकास कामांना सुरूवात केली जाणार होती़ यासाठी सर्वानुमते स्थायी समितीच्या बैठकीस मान्यता देखील मिळाली होती़ मात्र आचारसंहिता लागल्याने या कामांना स्थगीती मिळाली आहे़काही कामांना आधीच मंजूरीमहापालिकेवर भाजपानी सत्ता आल्यानंतर कोट्यावधीचा विकास कामांना मंजुरी मिळाली होती़ त्यापैकी आचारसंहिता लागण्यापुर्वी त्याकामांचे स्थायी समितीत मान्यता मिळाली होती़ त्यामुळे सध्या मंजूरी मिळालेले कामे शहरात सुरू आहेत़ त्यात काही कामांना बे्रक मिळाला आहे़कोट्यावधींची निविदा रद्दअकबर चौक, ताशा गल्ली परिसरातील ड्रेनेज कामांसाठी सुमारे ६ लाख ६० हजार ५४४ रूपयांना मंजूरी होती़ तर आग्रारोडवरील विविध ठिकाणी रस्ते कॉक्रीटीकरणासाठी सुमारे ३ लाख २७ हजार, तर शहरातील शिवाजी कॉलनी, आहिल्यादेवी नगरातील जॉगिंग ट्रॅकवर पेव्हर ब्लॉकसाठी ४ लाख ९७ हजार ९२९ रूपये व महापालिकेतील संत नरहरी महाराज यांच्या पुतळयाच्या चबुतऱ्यासाठी २८ लाख ६२८, नवीन व्यापारी संकुलासाठी २ कोटी ८७ लाख असा एकूण पाच ते सहा कोटींचे विकास कामे थांबली आहेत़अक्कलपाडा योजनाशहरासाठी कल्याणकारी असलेली अक्कलपाडा योजनेतुन धुळेकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागणार होता़उन्हाळ्यात या महत्वाकांशी योजनेची सुरूवात होण्याची नितांत गरज होती़ मात्र महापालिका प्रशासनाच्या नियोजना अभावी १३६ कोटी रूपयांची योजना अडकली आहे़ मनपाने योग्य ठेकेदाराची निवड केली असता ही योजना आचार संहिता पुर्वीच मार्गी लागली असती़ या योजनेच्या कामांसाठी स्थायी समितीच्या दोन सभा घेण्यात आल्या होत्या मात्र तरी देखील या योजनेचे काम पुर्ण होऊ शकले नाही़अक्कलपाडा योजनेसाठी ठेकेदाराला २१ महिन्यांची कालमर्यादा देण्यात आली होती़ मात्र आचार संहिता लागण्याने आणखी तीन ते चार महिने ही योजना मार्गी लागु शकत नसल्याचे समोर येत आहे़
आचारसंहिता लागल्याने दहा कोटींच्या कामांना ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:22 PM