आॅनलाइन लोकमतशिरपूर, (जि.धुळे) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात म्हैशीच्या गाड्या भरण्यासाठी हप्ता न दिल्यामुळे ५ जणांनी म्हैस व्यापाºयास मारहाण करून ५ हजार रूपये बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना ६ रोजी येथील कृउबाच्या आवारात ही घटना घडली़दहिवद येथील ६२ वर्षीय म्हैस व्यापारी बाबुलाल बनाजी गोपाळ हे अनेक वर्षापासून म्हैस खरेदी-विक्री करण्याचा व्यवसाय करतात़ ते येथील मार्केटमध्ये आले असतांना संशियत आरोपी रविंद्र आधार सोनवणे, सनी धुडकू सोनवणे, ऋषीकेश धुडकू सोनवणे सर्व राहणार शिरपूर यांचे सोबत इतर दोन अनोळखी इसम अशा पाच जणांनी म्हैशींच्या गाड्या भरण्यासाठी प्रत्येकी एक गाडी २ हजार रूपये महिन्याची मागणी केली़ हप्ता दिला नाही तर गाडी भरू देणार नाही तसेच मार्केट जाळून टाकू अशी धमकी देत संशयित आरोपींनी व्यापाºयाच्या खिशातून ५ हजार रूपये बळजबरीने काढून घेतले. या संदर्भात पोलिसात तक्रार दिली तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी सुध्दा देण्यात आली़ त्या व्यापाºयास मारहाण करीत असतांना अन्य जवळील व्यापारी मारहाण सोडविण्यासाठी गेले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली़याबाबत म्हैस व्यापारी बाबुलाल गोपाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचही जणांविरोधात शिरपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पुढील तपास प्रभारी पोनि अभिषेक पाटील करीत आहेत़
शिरपूर येथे म्हैस व्यापाऱ्यास केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 11:48 AM