ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 13 - शहरातील देवपूर भागातील समृद्धनगरसह परिसरात चोरटय़ांनी मंगळवारी रात्री उच्छाद मांडला. जितेंद्र सोनवणे यांच्या बंद घरातील विजेच्या तारा तोडून चोरटय़ांनी घरात जाळपोळ करून दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. शहरातील 80 फुटी रोड परिसरातही टाईपिंग इन्स्टिटय़ूटमध्येही चोरीची घटना घडली. या प्रकारांमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. जितेंद्र सोनवणे धडगाव येथे शिक्षक आहेत. त्यांची प}ी व मुले समृद्ध नगरात राहतात. मंगळवारी रात्री ते सर्व सोनवणे यांच्या शेजारीच राहणा:या बहिणीकडे झोपावयास गेले होते. त्यांचे स्वत:चे घर बंद होते. चोरटय़ांनी रात्री कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील दीड ते दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून घरात जाळपोळ केली. तत्पूर्वी त्यांनी घरातील विजेच्या वायरीही तोडल्या. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी सकाळी सोनवणे कुटुंबीय घरी परतले त्यावेळी हा सगळा प्रकार लक्षात आला. याच परिसरातील सचिन शेवतकर यांच्या घरातही चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. नेमके काय चोरीस गेले, अद्याप उघडकीस आलेले नाही. परिसरात यापूर्वीही अशाच पद्धतीने घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यातच ही घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. शहरातील 80 फुटी रोड परिसरातही मंगळवारी रात्रीच चोरीची घटना घडली आहे. निरामय हॉस्पिटलशेजारी असलेल्या कॉर्नर टायपिंग क्लासेसचे शटर उचकावून चोरटय़ांनी 8 संगणक व टाईपरायटर असा सुमारे 1 लाख रुपयांचा ऐवज लांबविला.दोन्ही घटनांमध्ये चोरटय़ांनी घरातील साहित्य फेकले, दुकानातील सामान अस्ताव्यस्त केले आहे. जळाल्यानेही वस्तू, साहित्याचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.