तळोदा : नंदुरबार येथून रांझणी येथे जाताना भरधाव वेगाने जाणाºया कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या महिलेचे डोके कंटेनरच्या पुढील चाकात आल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. कंटेनर चालकाला पकडण्यात आले असून निझर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगा मोतीराम मराठे (६५) व छोटीबाई मंगा मराठे हे दाम्पत्य नंदुरबार येथे झालेल्या क्षत्रिय मराठा समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी रविवारी शहरात आले होते़ विवाह सोहळा आटोपून दोन्ही आपल्या दुचाकीवर रांझणी येथे जात असताना सद्गव्हाण नाल्याजवळ मागून येणाºया कंटेनरने दुचाकीस धडक दिली़ यात छोटीबाई खाली पडून थेट कंटेनरच्या पुढील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे पती मंगा मराठे हेदेखील जबर जखमी झाले आहेत़ अपघात होताच पळ काढण्याच्या बेतात असलेल्या कंटेनर चालकाला परिसरातील नागरिकांनी पकडत बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले़ या अपघातामुळे रांझणी गाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़ छोटीबाई मराठे ह्या वाण्याविहीर येथील ‘लोकमत’चे वार्ताहर किशोर मराठे यांच्या भगिनी होत. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, मुले असा परिवार आहे़ मनमिळाऊ स्वभावाच्या असलेल्या छोटीबाई यांना समाजकार्यात आवड असल्याने त्या नेहमी अग्रेसर असायच्या.
माणकेत चारा जळून दोन लाखांचे नुकसान
By admin | Published: March 06, 2017 12:21 AM