आॅनलाइन लोकमतधुळे : पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे गणपती व फरशीपुलावरून बस वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांचे मोठे हाल होत होते. मात्र आता बारा दिवसानंतर गणपती व फरशी पुलावरून वाहतूक सोमवारपासून पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती धुळे आगारातून देण्यात आली.गेल्या ४ व ९ आॅगस्टला पांझरा नदीला आलेल्या महापुराचा फटका लहान (काजवे) पुलाला बसला होता. पुराचे पाणी पुलावरून गेल्याने, डांबरीकरण उखडले, तसेच पुलाच्या स्लॅबच्या सळया उघड्या पडल्या. पुराच्या पाण्यामुळे पुलाच्या स्तंभाचे पायाजवळील रेती वाहून गेली. त्यामुळे काही ठिकाणी स्तंभ उघडे पडले, त्यांना तडा गेला आहे. पुरामुळे पुलाचे नुकसान झाल्याने, या पुलावरून बसवाहतूक बंद करण्यात आली होती.त्यामुळे शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबार या भागातील बसेस देवपूर बसस्थानकात येत नव्हत्या. प्रवाशी, विद्यार्थी यांना नगाव चौफुलीवरच उतरावे लागत होते. यात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होऊ लागले होते. नगाव चौफुलीपासून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यासाठी रिक्षाने यावे लागत होते. तर नगाव चौफुलीपासून मध्यवर्ती बसस्थानकात येण्यासाठी एस.टी.तर्फे दहा रूपये जादा आकारण्यात येत होते. पुरामुळे पूल नादुरूस्त झाला, मात्र त्याचा आर्थिक फटका प्रवाशांना सोसावा लागत होता.यासंदर्भात शहरातील अनेक विद्यार्थी संघटना, स्वयंसेवी संघटनांनी जिल्हा प्रशासन, एस.टी. महामंडळाला निवेदन देवून पर्यायी मार्गाने बस सुरू करण्याची मागणी केली होती.त्यानुसार महापालिकेचे सहायक आयुक्त गणेश गिरी, मनपाचे कार्यकारी अभियंता कैलाश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एजाज शहा, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, आगार व्यवस्थापक भगवान जगनोर यांनी २९ आॅगस्ट रोजी पर्यायी मार्गाची पहाणी केली. त्यानंतर ३० आॅगस्टपासून नंदुरबारकडून मध्यवर्ती बसस्थानकात येणाºया बसेस स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, संभाजी उद्यान, गणपतीपूल, संतोषी माता चौकमार्गे बसस्थानकात येतील. तर देवपूरकडे जाणाºया बसेस संतोषीमाता चौक, कांकरिया टॉवर, जिल्हाधिकारी निवासस्थान, कालीकामाता व पंचमुखी हनुमान मंदिराच्या मधुन जाणाºया नवीन फरशी पुलावरून चौपाटीमार्गे सावरकर पुतळा मार्गाने जातील असे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार बससेवा सुरूही झाली. मात्र अवघे दोन-चार दिवस या नवीन मार्गाने बस सुरू राहिली.त्यानंतर पांझरा नदीला पुन्हा आलेल्या पुरामुळे दोंडाईचा, शिरपूरकडे जाणाºया बसेस पुन्हा गावाबाहेरून जाऊ-येऊ लागल्या. त्यामुळे पुन्हा प्रवाशांचे हाल होऊ लागले.दरम्यान आता पांझरा नदीला आलेला पूर ओसरू लागल्याने, १६ सप्टेंबरपासून गणपती व लहान फरशी पुलावरून पुन्हा बससेवा सुरू झाली आहे. देवपूरकडून येणाºया बसेस गणपतीपुलावरून शहरात येत आहेत, तर जाणाºया बसेस या संतोषीमाता चौक, जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान, कालिकामंदिरमार्गे फरशीपुलावरून देवपूर बसस्थानकाकडे रवाना होत आहेत.गावातून बससेवा पुर्ववत सुरू झाल्याने, प्रवाशांनी समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
धुळे येथील फरशी पुलावरून बस वाहतूक पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:55 AM