धुळे : पश्चिम पट्यातील पांझरा नदीच्या उगमस्थळावर पावसामुळे अक्कलपाडा धरणातील १७ पैकी ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून प्रतिसेकंद ५८ हजार ५०० क्युसेस पाण्याचा विसर्ग होत आहे़ पांझरा नदीला शुक्रवारी दुपारी आलेल्या महापूर पुराने नदीकाठावरील नागरिकांचे जनजीवन विस्कटीत झाले आहे़ प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचे आवाहन करण्यात आले आहे़जिल्ह्याभरात मुळसधार पाऊसाने नदी नाल्याना पुर आला आहे़ अक्कलपाडा धरणात पाण्याचा साठा अधिक झाल्याने गेल्या रविवारी पासुन पांझरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे़ मध्यतरी पाऊसाने दांडी मारल्याने नदीचा प्रवाह कमी झाला होता़ महापूर बंद करण्यात आलेले पुल पुन्हा सुरू करण्यात आले होते़ मात्र बुधवारी पासुन पाऊसाची सतत रिपरिप सुरू असल्याने अक्कलपाडा धरणात पुन्हा पाणीसाठा संग्रहित झाला़ त्यामुळे शुक्रवारी पाझरा नदीत पाणी सोडण्यात आले होते़ पहिल्यांदा पाहण्यासाठी धुळेकरांनी रात्रीही नदी किनारी गर्दी केली होती. दरम्यान कुठलीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्र्रवारी दुपारी पांझरा नदीला मोठा पूर येणार असल्याचे माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाल्यानंतर सकाळी मनपाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन पांझरा नदीकिनारी नियुक्त करण्यात आले़पुलावर वाहतुकीची कोंडी- पाण्याची पातळी वाढल्याने पांझरा नदीवर असलेले सिद्धेश्वर गणपती, सावरकर पुतळ्याजवळील आणि एकविरा देवी मंदिराजवळील पूल तसेच कालिका माता मंदिराजवळील बंधारा कम फरशीसुद्धा पाण्याखाली गेले. तसेच नदीच्या दोन्ही बाजुला तयार करण्यात येत असलेले समांतर रस्ते देखील पाण्याखाली आले. दुपारी शाळांना सुटी जाहीर करण्यात आल्यामुळे मोठ्या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोडी झाली होती़ त्यामुळे वाहतूक सुरूळीत करण्यासाठी पोलिसांना अडचणीला सामोरे जावे लागले होत़सेल्फीसाठी केली गर्दी- पांझरा नदीला महापूर आल्याने चारही पुलावरील वाहतूक बंद करण्यात आले होते़ तर पुर पाहण्यासाठी नदी काठावर अनेकांनी दुपारी गर्दी केली होती़ पांझरा नदीला पूर आल्याचे फोटो अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये काढून ते व्हायरल केल्याने, अनेकांना पुराची स्थिती समजू शकली.पुरग्रस्तांना मदतीचा हात- पांझरा नदीला पुर आल्याने नदीकाठावरील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे़ अनेकांचे घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले आहे़ पुरग्रस्ताना सुरक्षितस्थळी हलविण्याचे खासदार डॉ़ सुभाष भामरे, महापौर चंद्रकांत सोनार, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, कल्याणी अंपळकर, युवराज पाटील, शितल नवले, अमोल मासुळे, अजय नाशिककर, पारस देवपुरकर, सुनिल आहिरराव आदींनी आवाहन केले़पोलिसांनी गर्दीला पांगविली- पाण्याचा प्रवाह वाढल्याने, नदीचे पाणी गणपती मंदिरालगत आले. त्यामुळे पोलिसांनी पुलाजवळ जमलेल्या सर्वांना त्याठिकाणाहून पांगवून लावले. सुरक्षिततेचे उपाय म्हणून बॅरिकेटस लावले होते. शिवाजीरोड पर्यत पाणी दुपारी २ वाजता पांझरा नदीतील तिन्ही पुल पाण्याखाली गेले होते़ त्यामुळे नदी पात्रातील पाण्याचा प्रवाह शिवाजीरोड, ज्योती टॉकीज, अंजानशाह बाबा दर्गाच्या पायºयापर्यत पोहचले होते़ तर मोगलाई, आंबेडकर नगर, साईबाबा नगर परिसरातील घरे पाण्याखाली गेले होते़ देवपूर पश्चिम पोलीस स्टेशन व एकविरा देवी मंदिराच्या पायºया तसेच अमरधामपर्यंत पुराचे पाणी पोहचले होते़
पांझरेचा रूद्ररूपी तांडव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 1:47 PM
जनजीवन विस्कळीत : राहतं घर सोडून नागरिकांना करावे लागले स्थालांतर, अनेक घरांची पडझड
ठळक मुद्दे पुरग्रस्त ! मदतीसाठी प्रशासनाचे आवाहनशाळांना दोन दिवस सुटीपांझरा नदी पुराबाबत अलर्टप्रशासनाचे आवाहनस्थलातंराच्या दिल्यात सुचनापुलावरून वाहतूक बंद