शहरं
Join us  
Trending Stories
1
देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
2
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
3
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का
4
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
5
"चिरंजीवाचे प्रताप वडिलांनी एकदा समजून घ्यावेत"; वर्षा बंगल्याचा उल्लेख करत राऊतांचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा
6
गायक अदनान सामींना मातृशोक, ७७ व्या वर्षी आईने घेतला अखेरचा श्वास
7
नितीश कुमारांनी वाढवलं भाजपाचं टेन्शन; दसऱ्यानंतर होणार राजकीय 'भूकंप'?
8
कुछ तो गडबड है दया! शिवाजी साटम यांनी सांगितलं CID मालिका बंद होण्याचं कारण
9
रायबरेलीमध्ये मोठी दुर्घटना टळली; रुळावर मातीचा ढीग, लोको पायलटने ट्रेन थांबवली अन्...
10
लाखो लोक, ट्रॅफिक जॅम, रेल्वे स्टेशन फुल पॅक आणि...; मरिना बीचवरचे धडकी भरवणारे फोटो
11
बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेनंतर जिनिलिया देशमुखची पोस्ट, म्हणाली, "पुढच्या पर्वासाठी..."
12
Prajakta Mali : "तुझ्यातला प्रामाणिकपणा, जिद्द..."; प्राजक्ता माळीने केलं सूरज चव्हाणचं झापुक झुपूक अभिनंदन
13
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
14
मॉलच्या मेन गेटमधून आतही जाऊ दिलं नाही, पायऱ्यांवर पाहावी लागली वाट; Zomato चे CEO म्हणाले...
15
"...तेव्हा मला कुणी साधं भेटायलाही तयार नव्हतं..."; Bigg Boss 18 मध्ये गेलेल्या मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव
16
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
17
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
18
Share Market Opening : शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; Hero, HCL मध्ये तेजी, टायटन, अदानी पोर्ट्स घसरले
19
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
20
Adani's Big Move: अदानींनी सुरू केला भारतातील 'हा' मोठा प्रोग्राम, घरातील गॅस पुरवठ्याचं चित्र बदलणार, कसा होईल फायदा?

अडचणीवर मात करीत मोहीम यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 10:22 PM

संडे अँकर । जवाहर मेडीकल फाऊंडेशनकडील रस्ता तुटल्याने आपत्ती प्रतिसाद दल सक्रीय

धुळे : मुसळधार झालेल्या पावसामुळे साक्री रोडवरील जवाहर मेडीकल फाऊंडेशनकडे जाणारा रस्ता वाहून गेल्याने सर्वांचेच हाल झाले़ यामुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीने तातडीने येऊन मदतकार्य सुरु केले़ तातडीने हालचाली गतीमान करुन पायी जाणाऱ्यांची सोय करुन दिली़धुळे शहरात २५ जुलै रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला़ साक्री रोडवरील जवाहर मेडीकल फाऊंडेशनकडे जाणाºया रस्त्यावर शुक्रवारी सकाळी पाणी आल्याने पुन्हा एकदा एसीपीएम महाविद्यालय आणि रुग्णालयाचा शहराशी असलेला संपर्क तुटला़ या आधी साधारण १५ ते २० दिवसांपुर्वी नकाणे तलावाचे ओव्हरफ्लो झालेले पाणी रस्त्यावर आल्याने जवाहर मेडीकलचा संपर्क तुटला होता़ परिणामी संपर्कच तुटल्याने दिवसभर सर्वांचे हालच झाले़ डॉक्टरांसह सर्वांना देखील रुग्णालयात जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागल्याचे दिसून आले होते़अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मंत्रालय, नियंत्रण कक्ष मुंबई यांच्याकडून आदेश आल्यानंतर राज्य आपत्ती प्रतिसाद धुळे येथील पथकाने मदतकार्याला सुरुवात केली़ अडकलेल्या सर्वांना बाहेर काढत पायी जाणाऱ्यांसाठी सोय केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले़समादेशक यांचे मिळाले मार्गदर्शनराज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ६ चे समादेशक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहायक समादेशक बी़ आऱ चत्रे यांनी ही मोहीम यशस्वी केली़ त्यांना पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्यासह ३ पोलीस अधिकारी आणि २६ पोलीस कर्मचारी असे एक संपूर्ण पथक यांची मदत मिळाली़ त्यांना शोध आणि बचाव कार्यासाठी पाठविण्यात आले होते़ परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी आपले मदत कार्य केले़

टॅग्स :Dhuleधुळे