धुळे/ साक्री: केंद्र सरकारने लागू केलेला नागरी सुधारणा विधेयक राज्यात लागू करू नये, या मागणीसाठी साक्री शहरातील मुस्लिम समाज व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साक्री तहसील कार्यालयावर शनिवारी मोर्चा काढून निवेदन देण्यात आले़डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले होते़ मोर्चा मुस्लिम समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ हा मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार प्रवीण चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़केंद्र सरकारने लागू केलेले नागरी सुधारणा विधेयक मुस्लिम समाजावर अन्याय करणारे आहे़ त्यामुळे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ केंद्र सरकारकडून देशाची फाळणी करण्याच्या हेतून हे कटकारस्थान केले जात आहे़ संविधानाचे आर्टिकल १४, २१ व २५ यामुळे उल्लंघन होत आहे़ एका विशिष्ट समाजावर अन्याय करणारे विधेयक रद्द करण्यात यावे़ अशा मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली़ तहसील कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आले़ मोर्चात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस उपअधीक्षक ग्रामीणचे श्रीकांत घुमरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़ ि
नागरी सुधारणा विधेयक तत्काळ रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 10:54 PM