लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चोरीच्या मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी काही इसम येणार असल्याची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी सापळा लावून तिघांना शिताफिने पकडले़ त्यांच्या प्राथमिक चौकशीतून १९ मोबाईल आणि २ दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत़ मोहाडी उपनगरात राहणारे नरेंद्र प्रकाश पाटील हे रेन्सीडेन्सी पार्कच्या बाजुस असलेल्या रोडाने मोबाईल फोनवर बोलत गावात जात असताना मागावून येणाºया मोटारसायकलवरील दोघापैकी एकाने त्यांच्या हातातून १८ हजार ९९० रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पोबारा केला़ ही घटना ७ सप्टेंबर रोजी घडली़ याप्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आली होता़ या प्रकरणाचा तपास सुरु असताना चालत्या दुचाकीवरुन नागरीकांचे मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा करणारे काही इसम सिव्हील हॉस्पिटल ते गुरुद्वारादरम्यान येणार असल्याची गोपनीय माहिती मोहाडीचे पोलीस कर्मचारी गणेश भामरे यांना मिळाली़ माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस उपनिरीक्षक डी़ एस़ मोरे यांच्यासह प्रभाकर ब्राम्हणे, गणेश भामरे, देवा वाघ, दीपक महाले यांनी घटनास्थळी सापळा लावला होता़ त्यात भिमा पुना निकम (रा़ नटराज टॉकिजमागे, निळा चौक, धुळे), हिमांशू राजेंद्र रोकडे आणि आकाश शंकर ठाकरे (दोनही रा़ जलाराम मंदिराजवळ, नटराज टॉकिजमागे, धुळे) या तिघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले़ त्यांच्या प्राथमिक चौकशीतून २० हजार रुपये किंमतीची विना नंबरची दुचाकी, एमएच १८ बीजे ६६३१ क्रमांकाची ३० हजार रुपये किंमतीची एक दुचाकी आणि याशिवाय वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या किंमतीचे १९ मोबाईल असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़ दरम्यान, तिघां संशयितांची चौकशी सुरु असून चोरीचे मोबाईल, दुचाकी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही
धुळ्यात १९ मोबाईल २ दुचाकी तिघांकडून हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 4:22 PM
२ लाख २० हजाराचा मुद्देमाल : मोहाडी पोलिसांची कामगिरी
ठळक मुद्देमोहाडी पोलिसांची कामगिरी१९ मोबाईलसह २ दुचाकी हस्तगत