लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा बाबत अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय देऊन मराठा आरक्षण मंजूर केले़ विरोधातील सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत़ मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत आरक्षण मिळणार असल्याने मराठा क्रांती मोर्चा आणि समाजातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे़ *अभ्यासपूर्ण दृष्टीकोन*मराठा समाजाचा आरक्षण मागणीचा शांतपूर्ण संघर्ष व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा मराठा आरक्षण संबंधी कालबध्द कार्यक्रम आणि अभ्यासपूर्ण दृष्टीकोणाचा हा विजय आहे़ याचा फायदा सर्वसामान्य नागरीकांना होणार आहे़ - जयकुमार रावलमंत्री पर्यटन व रोहयो *आरक्षणासाठी संघर्ष*महाराष्ट्रातील मराठा समाज पेटून उठला़ महाराष्ट्रभर आंदोलन झालीत़ त्यात मराठा समाजाच्या ४० तरुणांनी बलिदान दिले़ यातूनच मराठा समाजाला आरक्षणाची किती आवश्यकता आहे हे दिसून येते. या आंदोलनात धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली असून धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे महिनाभर आंदोलन केले़ त्यातच प्रतिकात्मक आंदोलन करून मराठा समाजच्या १४२ आमदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली़ आरक्षण मिळाल्याने आनंद आहे़ - मनोज मोरे, जिल्हाध्यक्ष मराठा क्रांती मोर्चा*एकजुटीचा हा विजय *मराठा समाजाला सरकारी नोकºयांमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण देणाºया कायद्याला आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे़ हा राज्यातील तमाम मराठा समाजाच्या जनआंदोलनाचा मोठा ऐतिहासिक विजय आहे. या आरक्षणामुळे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना फायदा होणार आहे. या निर्णयामुळे राज्य सरकार, विरोधी पक्ष, राज्य मागास आयोग तसेच न्यायालयाचे मनापासून आभार मानतो़ तसेच मराठा समाजाच्या एकजूटीचा हा विजय आहे़- निंबा मराठेजिल्हा सचिव, मराठा क्रांती मोर्चा, धुळे जिल्हा *ही तर आनंदाची बाब*मराठा समाजाला आरक्षण मिळाले, ही आनंदाची बाब आहे़ आज मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागास आहे़ या समाजाला आरक्षणामुळे विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी मदत मिळणार असून शिक्षण आणि नोकरी यात फायदा होणार आहे़ आरक्षणाचे स्वागत करायला हवे़ - मिना भोसलेसदस्य, मराठा क्रांती मोर्चा
मराठा क्रांती मोर्चातर्फे आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:40 PM