आॅनलाइन लोकमतधुळे : जळगाव येथील समता नगरातील आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी धुळे येथील वाल्मिकी मेहतर समाजातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून या मोर्चाला सुरवात झाली. तेथून पोलीस अधीक्षक कार्यालय, कमलाबाई कन्या हायस्कुलमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. मोर्चात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. यावेळी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले. त्यात म्हटले आहे की, जळगाव येथील समता नगरात राहणाºया आठ वर्षीय बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिची निर्दयपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे समाजातील नागरिकांनामध्ये संताप निर्माण झाला असून, या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. आरोपीचे हे कृत्य मानवतेला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशी करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा. हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी. त्या नराधामास फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्याय पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा तसेच त्यांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी करण्यात आली.
आठ वर्षीय बालिकेच्या खून प्रकरणी धुळ्यात निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:48 PM
जिल्हाधिकाºयांना निवेदन, आरोपींना फाशी देण्याची मागणी
ठळक मुद्देसकाळी ११ वाजता मोर्चाला सुरवातमोर्चात महिलांची संख्या लक्षणीयपाच बालिकांनी दिले जिल्हाधिकाºयांना निवेदन