लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : चाळीसगाव रोडवरील चौफुलीजवळ सुरु असलेल्या बेकायदेशीर कत्तलखाना पोलिसांनी उघडकीस आणला़ याठिकाणी छापा टाकत गो-मांस यासह ट्रक, टेम्पो असा एकूण २८ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई गुरुवारी करण्यात आली़ याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़ शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळ असलेल्या साई किनारा लॉजच्या बाजुला जैद साबिर भंगारवाला याच्या गोडावूनमध्ये बेकायदा कत्तलखाना सुरु असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांना मिळाली़ माहिती मिळताच गुरुवारी सकाळी ११ ते साडे अकरा वाजेच्या सुमारास छापा टाकण्यात आला़ यावेळी त्या ठिकाणी जनावरांचे मांस आढळून आले़ १४० प्लॅस्टिक ड्रममध्ये हे मांस भरुन एमएच ०४ सीए ७१० आणि पिकअप व्हॅन एमएच ४१ जी २४१२ या वाहनातून घेवून जाण्याच्या तयारीत असल्याचे आढळून आले़ पोलिसांनी वाहनांसह मांस, इलेक्ट्रिक काटा, ड्रम, कोयता, कुºहाड असा एकूण २८ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ जप्त केलेल्या मांसाची विल्हेवाट वरखेडी रोडवर लावण्यात आली़ याप्रकरणी पोलीस कर्मचारी जोऐब रऊफ पठाण यांनी गुरुवारी दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली़ त्यानुसार मालेगाव येथील कुरेशी शफीक अहमद खलील अहमद (२४) याच्याविरुध्द भादंवि कलम ४२९, ३६९, २७८ आणि महाराष्ट्र प्राणी अधिनियमानुसार संशयावरुन गुन्हा दाखल करण्यात आला़ सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आहेर तपास करीत आहे़
धुळ्यात २८ लाखांचे जनावरांचे मांस पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 3:56 PM
कारवाई : बेकायदा सुरु होता कत्तलखाना
ठळक मुद्देचाळीसगाव रोड पोलिसांची कारवाईट्रक, टेम्पोसह २८ लाख ७५ हजाराचे मांस जप्तमालेगावच्या एकाविरुध्द धुळ्यात गुन्ह्याची नोंद