लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील फागणे गावात एका किराणा दुकानात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या काही तासांतच यश आले असून पोलिसांनी चोरीला माल हस्तगत करीत गावातील दोन संशयितांना अटक केली आहे़फागणे गावात रविवारी रात्री संकेश्वर किराणा दुकान फोडून चोरट्यांनी हजारो रुपये किंमतीचा किराणा माल चोरुन नेला होता़ याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला़दरम्यान, या दुकानात चोरी करणाऱ्यांची माहिती गुप्त बातमीदाराने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना दिली़ गावातील आबा पवार या संशयिताने चोरी केल्याची माहिती त्यांना मिळाली होती़ त्यांनी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ यांचे मार्गदर्शन आणि परवानगी घेतली़ बुधवंत यांच्यासह पोलिस उप निरीक्षक हनुमान उगले, हवालदार रफिक पठाण, पोलिस नाईक प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, गौतम सपकाळे, राहुल सानप, पोलिस वाहन चालक विलास पाटील आदींनी मिळालेल्या माहितीनुसार संशयिताच्या घरात छापा मारला़ त्यावेळी या घरात २५ हजार २९२ रुपये किंमतीचा किराणा माल मिळून आला़आबा राजू पवार (३२) आणि सुनील लक्ष्मण पाटील (२५) दोघे रा़ फागणे या दोघांना अटक केली़
किराणा माल चोरणाऱ्या दोघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 10:51 PM