लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरात कारमधून दारुची अवैध वाहतूक करणाºया दोघांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे़साक्री रोडवरील जे़ के़ ठाकरे दवाखान्याजवळ सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली़एम़ एच़ १५/ई़ एक्स़ १५८९ क्रमांकाच्या कारमध्ये दारुसाठा असून सदर कार सुरत बायपास हायवेडून साक्री रोडमार्गे धुळे शहरात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती़ त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मनिष विलास सोनगीरे, व्ही़ आऱ भामरे, पी़ पी़ पाटील, एऩ के़ पोतदार यांच्या पथकाने सापळा रचून साक्री गाडी जे़ के़ ठाकरे दवाखान्याजवळ अडविली़गाडीतील चालक आणि अन्य एकाला विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला़ गाडीच्या डीक्कीची तपासणी केली असता त्यात विदेशी कंपन्याच्या दारुचे खोके आढळून आले़ या दारुची किंमत १४ हजार ४२० रुपये आणि गाडीची किंमत अडीच लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले़ याप्रकरणी योगेश शरद खोपडे (ग़ नं़ ४ धुळे), कुणाल विठ्ठल रायकर (पवन नगर, पश्चिम हुडको धुळे) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक केली़
कारमधून दारुची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 8:32 PM