लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : तालुक्यातील बोराडी गावापासून जवळ असलेल्या महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमाहद्दीवरील सातपुडा पर्वत रांगेत बाबाकुंवर डोंगराच्या बाजूला यादवकालीन गुफा गेल्या चार वर्षापासून आढळून आली आहे़ या गुफेचा मार्ग सेंधव्याच्या किल्ल्यापर्यंत असल्याचे जाणकारांचे मत आहे़ याच डोंगराच्या पायथ्याशी यादवकालीन मंदिर यापूर्वीच आढळले आहे़ बोराडी गावापासून प्रधानदेवी गाव ७-८ किमी अंतरावर आहे़ या गावाच्या समोरील सातपुड्याच्या पर्वतात गेल्या काही वर्षापूर्वी शिवालयाचे यादवकालीन मंदिर आढळून आले आहे़ याठिकाणी इतर मंदिरेही असून त्यांची पडझड झाली आहे़ सन १०३५ ते १८५५ च्या काळातील ही मंदिरे आहेत़ सातपुड्याच्या रांगेत यादवकालीन शिवालय, प्रधानदेवी, बाबाकुंवर मंदिर, सजगार पाड्याजवळील शिवालय मंदिर हे यादवकालीन असल्याचा दावा पुरातन विभागातील अभ्यासकांनी केला आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अभ्यासक याकडे फिरकले सुध्दा नाहीत़ जुलै २०१५ मध्ये गुरे चारण्यासाठी गेलेल्या तरूणांनी ही गुफा पाहिली़ त्यामुळे गुफा विषयी चर्चा रंगू लागल्यामुळे ती पाहण्यासाठी गर्दी होवू लागली आहे़ गेल्या काही वर्षापासून या पर्वत रांगेत अनेक आदिवासी शेती करून तेथेच परिवारासह राहत आहेत़ त्यांच्याकडे गुरे-ढोरे व शेळ्या-मेंढ्या देखील आहेत़ रात्रीच्या वेळी वन्यप्राणी येवून प्राण्यांवर हल्ला केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत़ दिवसा देखील गुरे चारण्यासाठी गेलेल्या प्राण्यांवर वन्यप्राण्यांनी हल्ले केले आहेत़ सदर गुफेचा मार्ग सेंधव्या किल्ल्यापर्यंत असल्याचे सांगण्यात येते़
* पायवाटेने जावे लागते गुफापर्यंत *४सातपुड्याच्या पर्वत रांगेत असलेल्या बाबाकुंवर डोंगराच्या बाजूने गुफेकडे जाण्याचा मार्ग आहे़ हजारो फुट उंचीवर असलेल्या धोकेदायक डोंगरावरून पायवाटेने जावे लागते़ डोंगराच्या दोन्हीं बाजूने खोल दरी असून वरून धबधब्याचे पाणी पडते़ तेथूनच गुफेचा मार्ग आहे़ गुफा डोंगरेच्याकडेला जाण्यासाठी दीड ते दोन फुट उंची व दोन ते तीन फुट लांबीचे बोगद्यातून मध्ये जाण्यासाठी सरपटत जावे लागते़ गुफेचा मध्ये गेल्यावर ४-५ फुट उंच-रुंद गुफा आहे़ दोन्ही बाजूने रस्ते असून ही गुफा किती लांब आहे, हे पाहण्याचे धाडस कुणीही करत नाही़ त्यामुळे गुफाची लांबी कळू शकलेली नाही़* यादवकालीऩ़़*भुयारी गुफेत अंधार असल्यामुळे पुढे कुणीही जात नाही़ काही अंतरावर वटवाघुळ व इतर पक्षी अंगावर धावतात़ आतापर्यंत त्या भागातील ५-६ आदिवासी तरूणांनीच जाण्याची हिंमत दर्शविली आहे़ गुफा जवळून धबधब्याचे पाणी वाहते़ याठिकाणी असलेल्या एका दगडावर शिलालेख असून देवनगरी लिपीत अस्पष्ट अक्षरे दिसतात़ शिलालेखावरून हे मंदिर यादवकालीन असावे असे जाणकार सांगतात़