लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरासह जिल्ह्यात नेहमी मोर्चे, धरणे व रास्तारोको आंदोलने होतात़ तसेच रॅली, सभा, मिरवणुकाही असतात़ अशावेळी त्याचे कव्हरेज करण्यासाठी पोलीस वाहनांवर मुव्हेबल कॅमेरे आवश्यक आहे़ पोलिसांच्या वाहनांवर कॅमेरे बसविल्यास संशयितांवर वचक बसण्यास मदत होणार आहे. त्यासाठी आवश्यक ती तयारी सुरु करण्याचे काम मार्गी लावले जात आहे़ परिणामी लवकरच पोलिसांच्या प्रत्येक वाहनांवर लवकरच ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावण्याचा मनोदय पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला़ शहरात ६ पोलीस ठाणे आहे़ त्यात शहर अतिसंवेदनशील म्हणूून ओळखले जाते़ धुळे शहरात किरकोळ कारणाचेही पर्यवसान दंगल, दगडफेकीत होते़ अशाच काही कारणावरून २००८ व २०१३ मध्ये शहरात दोन गटांत दंगल घडली होती़ त्यात जीवित व वित्त हानी देखील झाली होती़ तसेच जिल्ह्यात विविध सण-उत्सव उत्साहात साजरे होत असतात़ अशा वेळी नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत असतात़ त्यावेळेस काही कारणावरून वाद झाला तर त्याचे हाणामारीत रूपांतर होण्याचा धोका असतो़ त्यामुळे नागरिकांची धावपळ होते़ त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो़ तो निर्माण होवू नये म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यावश्यक झाले आहे़ तसे झाल्यास गुन्हेगारांवर जरब बसविणे शक्य होणार आहे़ अशा विश्वासही पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे़ तसेच चोरी, चेनस्रॅचिंग, महिलांची छेड, हाणामारीच्या घटना रोखण्यासही पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेºयांची मदत होणार आहे़शहरात मुख्य बसस्थानक व रेल्वे स्थानक, शासकीय रूग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जि़ प. कार्यालय, पोलीस मुख्यालय, स्टेट बँक मुख्य शाखा आदींसह सर्व प्रमुख शासकीय कार्यालये तसेच कमलाबाई कन्या शाळा, पालेशा महाविद्यालय, जिजामाता हायस्कूल, जेआरसीटीसह न्यू सिटी व नुतन पाडवी हायस्कूल, या शिवाय सर्व मुख्य चौक, मंदिरे येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाने म्हटले आहे़ कॅमेरे बसविल्यास त्याद्वारे मिळणाºया फुटेजमधून घटनेतील गुन्हेगारांचा शोध लागण्यास मदत होणार आहे़वाहनाद्वारे राहणार ‘वॉच’कोणतीही घटना घडल्यानंतर त्या अनुषंगाने तपास करत असताना भक्कम पुरावा नसल्यामुळे तपास कामात खूपच अडचणी येत असतात़ त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी पोलिसांच्या प्रत्येक वाहनांवर सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यास संशयितांच्या हालचाली टिपता येतील आणि त्यानुसार कारवाईचे सत्र अवलंबिता येईल असा विश्वास पोलीस प्रशासनाला आहे़
धुळ्यातील पोलीस वाहनांवर आता लवकरच ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 5:27 PM
हायटेक प्रशासन : तपास कामातील गती मिळविण्यासाठी आता भक्कम पुरावा
ठळक मुद्देशहरातील संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे नियोजन असताना विविध महनीय व्यक्तींचे पुतळे देखील आहेत़ त्यांची सुरक्षितता ठेवणे ही देखील प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे़ ती त्यांनी पार पाडत असताना सीसीटीव्ही कॅमेराची मदत घेणे क्रमप्राप्त आहे़ मुख्य बसस्थानकानजिक डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आलेला आहे़ अशाच प्रकारे विविध सर्व महनीय व्यक्तींच्या पुतळ्याजवळ कॅमेरे लावण्याची आवश्यकता निर्माण आहे़ पुतळ्याची कोणत्याही प्रकारची विटंबना होत नाही आणि यदाकदाचित झालीच तर याला जबाबदार कोण? हे कॅमेराच्या माध्यमातून स्पष्टपणे मदत होऊ शकेल़ यासाठी ही बाब गांभिर्याने घेत असताना पोलीस प्रशासनाने याकडे देखील लक्ष देणे गरजेचे झालेले आहे़