देवपुरातील एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय ते मराठा बोर्डिंगपर्यंत असलेल्या जुन्या आग्रा रोड वरील रस्त्याच्या दुतर्फा रस्त्याची एका बाजूचा मुख्य रस्ता गेल्या दीड वर्षापासून खोदून पडला आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी एकच रस्ता असल्याने नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीला सामारे जावे लागत आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारींवरून देवपूर शिवसेना विभागाच्या वतीने उपमहानगर प्रमुख ललित माळी यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी केली. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व मजिप्रा तसेच महापालिकेकडूल दखल घेण्यात आलेली नाही. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, विधानसभा संघटक डॉ. सुशील महाजन, महानगर प्रमुख सतीश महाले महानगर प्रमुख मनोज मोरे, संगीता जोशी, गुलाब माळी, जवाहर पाटील, रवींद्र काकड, देवीदास लोणारी, चंद्रकांत गुरव, नितीन शिरसाठ, सदाशिव पाटील, ललित माळी, हरीश माळी, दिनेश पाटील, मोहित वाघ, शाखा प्रमुख रोहित अमृतकर, शाखा प्रमुख संदीप माळी, महेश माळी आदी शिवसैनिक उपस्थित होते.
ठेकेदारास काळ्या यादीत टाका
या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच सदर काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या दोषी अधिकारी व ठेकेदाराची तात्काळ चौकशी करून दोषींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करावी, ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.