धुळे : जागतिक मूक बधीर दिनाचे औचित्यसाधून मूकबधीर मुलांसोबत घेऊन केक कापण्याचा कार्यक्रम पार पडल्याने सर्वच मुलांच्या चेहºयावर हसू उमटले़ समाधान त्यांच्या चेहºयावर दिसून आले़ हा आगळावेगळा कार्यक्रम धुळे जिल्हा मूक बधीर असोसिएशनतर्फे पार पडला़ धुळे जिल्हा मूक बधीर असोसिएशनतर्फे धुळे येथील एल.एम.सरदार उर्दू हायस्कूलच्या हॉल मध्ये रविवारी दुपारी दोन वाजता ६२वा जागतिक मूक बधीर दिन धुळे जिल्हा मूक बधीर असोसिएशनचे कायदेशीर सल्लागार अॅड़ उमाकांत घोडराज व मूक बधीर महिला मंडळाचे अध्यक्षा नंदिनी ओक यांच्या उपस्थितीत केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आकाश कपूर, प्रशांत मोरे रेखा माळी, पूनम कोठावदे आदी उपस्थित होते. यावेळी अॅड़ घोडराज यांनी असोसिएशनच्या कामाचे कौतुक करत मूक बधीर मुले, मुली व मूकबधीर लोकांनी संघटीत होऊन संघटनेत एकत्र येण्याचे व दर रविवारी घेण्यात येणाºया अभ्यासवर्गास उपस्थित राहण्याचे आवाहन केले़ मूकबधीर मुलांना न्यायालयाच्या आदेशानुसार परिवहन आयुक्त यांच्या पत्रकान्वये व असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या पाठपुरावामुळे धुळे परिवहन विभागाचे अधिकारी यांनी मुकबधीर मुलांना वाहन चालविण्याचा परवाना दिल्याबद्दल परिवहन कार्यालयाचे आभार मानले. कार्यक्रमास मूक बधीर महिला मंडळाचे अध्यक्षा नंदिनी ओक यांनी मूक बधीर मुलींना येणाºया अडचणी तसेच महिलांना न मिळणारे स्वातंत्र, लग्नानंतर मूकबधीर महिलांना बंदिस्त ठेऊन त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार, घरात मिळणारी वेगळी वागणूक, समाजातील लोकांचा मूकबधीर मुलामुलींकडे पहाण्याचा व वागणुक देण्याचा दृष्टीकोण कसा बदलवता येईल आदी विषयावर चर्चा करत मार्गदर्शन केले.आकाश कपूर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले व नोव्हेंबर महिन्यात घेण्यात येणाºया मुकबधीर वधू वर परिचय मेळाव्यात नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले.
जागतिक मूक बधीर दिनानिमित्त केक कापून आनंदोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 1:05 PM