आॅनलाइन लोकमतसोनगीर (जि. धुळे) : यावर्षी रथोत्सव आचारसंहितेच्या काळात येत असल्याने, उत्सव साजरा करण्याची वेळ रात्री १० पर्यंतच राहील. जातीय सलोखा कायम राखत रथोत्सव शांततेत साजरा करावा असे आवाहन प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी केले.येथील श्री बालाजी रथोत्सवाच्या पार्शवभूमीवर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे उपस्थित होते.जातीय सलोखा राखण्यासाठी सगळ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. मुलं पकडणारी टोळी, पाकीट चोरणारा, अज्ञात व्यक्ती विषयी शहानिशा करावी. अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. येणारा रथोत्सव शाततेत साजरा करावा. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. रथोत्सव विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत आल्याने वेळेचे बंधन पाळावे लागेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी महावितरणचे अभियंता एच. व्ही अहीरे प्रभारी सरपंच धनंजय कासार, अविनाश महाजन, धनगर, शिवनाथ कासार, प्रकाश गुजर, मुन्ना पठान, प्रमोद धनगर, किशोर पावनकर, विशाल मोरे, चेतन चौधरी, एम. टी. गुजर, अर्जुन मराठे, आरिफ खॉ पठाण, रोशन जैन, डॉ. कल्पक देशमुख, आरिफ पठाण, सरदार शेख, एकबाल हाजी, निखिल परदेशी, शकील हाजी, डॉ. अजय सोनवणे, संजय पाटील, आदी उपस्थित होते.
सोनगीर येथील रथोत्सव शांततेत साजरा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 1:58 PM