धुळे : शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्र व राज्य सरकारची संयुक्त (क्यूसीआय) समिती शहरात दाखल होणार असून दोन दिवस स्वच्छतेच्या परिस्थितीची पाहणी करून गुणांकन केले जाणार आह़े त्यानुषंगाने महापालिकेची तयारी पूर्णत्वास आली आह़े दरम्यान, सदर समितीच्या पाश्र्वभूमीवर मनपात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला असून वारंवार बैठका घेण्यात येत आहेत़ अवघी यंत्रणा स्वच्छतेच्या कामाला लागली आह़ेस्वच्छ सव्रेक्षण 2017 अंतर्गत महापालिकेने नोव्हेंबर महिन्यापासूनच तयारीला सुरुवात केली आह़े शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी व शहराचे मूल्यमापन करून गुणानुक्रम ठरविण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र सव्रेक्षणांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत़ स्वच्छ सव्रेक्षणाविषयी शासनाने केलेल्या मार्गदर्शनानुसार महापालिकेने विविध उपाययोजना केल्या आहेत़ त्यात प्रामुख्याने घंटागाडय़ांवर ‘जीपीएस’ प्रणाली, सफाई कर्मचा:यांची बायोमेट्रिक हजेरी, कचरामुक्तीसाठी टोल फ्री नंबर, मोबाइल अॅप यासारखे उपक्रम राबविण्यात आले आहेत़ या सर्व उपाययोजनांसह शहरातील रस्ते, साफसफाई, गटारी, खुल्या जागेतील कचराकुंडय़ांची केंद्रीय पथकाद्वारे तपासणी करण्यात येणार आह़े त्यासाठी सहायक आयुक्तांसह सहायक आरोग्याधिकारी, स्वच्छता निरीक्षकांवर जबाबदारी सोपविण्यात आली आह़ेया उपाययोजनांवर भरस्वच्छ भारत सव्रेक्षणांतर्गत मनपातर्फे कचरा उचलण्याचे नियोजन, रस्त्यांवर दिवसातून दोन वेळा झाडलोट करणे, दुकाने व बाजारपेठेतील कचरा संकलन, घरोघरी, तसेच मंगल कार्यालयांमधून कचरा संकलन, कचराकुंडय़ांची पुरेशी उपलब्धता, व्यावसायिक क्षेत्रांमधील कच:याचे निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण, निवासी क्षेत्रांमध्ये एकदा झाडलोट व स्वच्छता, कचराकुंडीमुक्ती यासह उपाययोजनांवर भर देण्यात आला आह़े प्रभाग 13 हा आदर्श प्रभाग म्हणून जाहीर करण्यात आला आह़ेशौचालयांचा कायापालटशहरात वैयक्तिक शौचालयांसाठी 3 हजार 826 लाभार्थीची निवड करण्यात आली होती़ त्या सर्व लाभार्थीनी शौचालये उभारली आहेत असा मनपाचा दावा आह़े त्यामुळे वैयक्तिक शौचालयांचे काम 100 टक्के पूर्ण करण्यात आले आह़े तर सार्वजनिक शौचालयांचीदेखील दुरुस्ती करण्यात आली असून काही ठिकाणी नवीन शौचालयांची उभारणी करण्यात आली असल्याचे मनपाकडून स्पष्ट करण्यात आले आह़ेहगणदरीमुक्तीसाठी प्रयत्नशहरातील 44 ठिकाणी उघडय़ावर शौचास बसणा:या नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याने या परिसरात महापालिकेने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत़ उघडय़ावर शौचास बसणा:यांना गुलाबपुष्प देणे, ढोल वाजविणे, बॅनर्सद्वारे जनजागृती, पोलीस ठाण्यात नेऊन कारवाई करणे यासारख्या उपाययोजनांचा त्यात समावेश आह़े सर्व 44 ठिकाणे व 35 प्रभाग हगणदरीमुक्त झाले आहेत़ शाळांची स्वच्छता व पाहणीशहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनादेखील मनपाने पत्र देऊन स्वच्छतेचे आवाहन केले आह़े तसेच स्वतंत्र पथक नेमून शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत़ शाळांमध्ये स्वच्छतागृह, वर्गखोल्या, परिसराची स्वच्छता करण्यात आली आह़े केंद्रीय समितीकडून काही शाळांमधील स्वच्छतेची पाहणी केली जाणार आह़ेनिधीची उपलब्धता अवलंबूनमहापालिकेने आतार्पयत केलेल्या सर्व उपाययोजनांची खरी परीक्षा या समितीच्या पाहणीतून होणार आह़े समिती केवळ पाहणीच करणार नसून नागरिकांशी संवाद साधणार आहे व त्यांना विविध प्रश्न विचारणार आह़े तसेच जियो टॅगद्वारे प्रत्येक ठिकाणचे छायाचित्र घेणार आह़े दोन दिवस समितीकडून प्रत्यक्ष पाहणीसह आढावा घेतला जाईल़ या पाहणीनंतर होणा:या गुणांकनावर भविष्यात मिळणारा निधी अवलंबून असेल़
केंद्रीय समिती करणार स्वच्छतेची पाहणी!
By admin | Published: January 20, 2017 12:17 AM