लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात बारावीच्या सर्वच केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाधरन देवराजन यांनी केंद्रसंचालक, पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापकांना तब्बल एक तास धारेवर धरीत कानउघाडणी केली. कॉपीचे प्रकार थांबले नाहीत, तर संबंधित केंद्रसंचालक, पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन देवराजन यांच्या अध्यक्षतेखाली आज सायंकाळी केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापकांची तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैठकीला माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे होते.जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे नियोजन करण्यात आले. त्यासंदर्भात बैठकाही घेण्यात आल्या. असे असतांनाही सर्वच परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी सुरू असल्याचे सीईओंना आढळून आले.कॉपीमुक्त अभियान सुरू असतांनाही कॉपी सुरू आहे? कॉपीमुक्तसाठी आतापर्यंत काय नियोजन केले, असा प्रश्न करून त्यांनी सर्वांनाच निरूत्तर केले. कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी कोणीही गंभीरपणे काम करीत नसल्याच्या संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. एका केंद्रावर विद्यार्थी पुस्तक घेऊन परीक्षा देण्यासाठी येतो. परीक्षा केंद्राबाहेरच विद्यार्थ्यांच्या बॅगा पडलेल्या असतात, अशी ही कोणत्या प्रकारची तपासणी सुरू आहे, असा प्रश्नही त्यांनी केला. काही केंद्रावर कॉपीसाठी एकप्रकारे प्रोत्साहनच दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.दरम्यान काही केंद्रसंचालक, विस्तार अधिकाºयांनी पोलीस संरक्षण देत नसल्याचे सांगितले. यावरही गंगाथरन देवराजन यांनी उत्तर दिले. ते म्हणाले विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचे काम केंद्र संचालक, पर्यवेक्षकांचे आहे, पोलिसांचे नाही. कॉपीचे प्रकार थांबविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करा, केंद्रसंचालक, विस्तार अधिकाºयांनी पेपर सुरू होण्यापूर्वी एक तास अगोदरच केंद्रात पोहचावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.कारवाई फक्त भरारीपथकानेच करावी का?जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर कॉपी सरसकट सुरू आहे. किती केंद्र संचालकांनी कॉपी पकडली, असा सवाल त्यांनी केला असता, एकाही केंद्रसंचालक, विस्तार अधिकाºयाला उत्तर देता आले नाही. कॉपी पकडण्याची जबाबदारी फक्त भरारी पथकांचीच आहे का? असा प्रश्नही त्यांनी केला.दोष विद्यार्थ्यांचा नाहीकेंद्रावर होणाºया कॉपीप्रकरणी दोष विद्यार्थ्यांचा नाही तर यंत्रणेचा आहे. केंद्रावरील संबंधितांनी योग्यप्रकारे तपासणी केली तर परीक्षेत कॉपी होणार नाही.मात्र कोणी मनापासून कामच करीत नाही, त्यामुळे कॉपी होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अहिरे यांनीही पालक वर्गात घुसतात, केंद्रसंचालक, व पर्यवेक्षक काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला.गुन्हा दाखल करूदरम्यान अशाच प्रकारे कॉपी सुरू राहिली तर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला. मोबाईल ताब्यात घ्याकेंद्रावरील केंद्र संचालक व पर्यवेक्षकांचे मोबाईल बैठे पथकाने ताब्यात घ्यावेत अशा सूचना प्रविण अहिरे यांनी केल्या.तर बहिष्कार टाकू : पवारकेंद्र संचालक, पर्यवेक्षकांवर गुन्हे दाखल केल्यास, परीक्षेवर बहिष्कार टाकू असा इशारा समन्वय समितीचे संजय पवार यांनी दिला आहे.
धुळे जिल्ह्यातील केंद्रसंचालक, विस्तार अधिकाºयांना सीईओंची तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:55 PM
कॉपी न थांबल्यास गुन्हे दाखल करणार
ठळक मुद्देजिल्ह्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी सुरूकॉपी प्रकारामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी संतप्त कॉपी न थांबल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश