धुळे : शहरात हिंदू नववर्षानिमित्त उत्साहाचे वातावरण असून बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे़ नागरिकांकडून विविध वस्तुंच्या खरेदीला प्राधान्य दिले जात असून एकमेकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या जात आहेत़साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला गृह खरेदी, वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची खरेदी नागरिकांकडून करण्यात येत असते़ बाजारात कितीही तेजी असली तरी त्याला प्रतिसाद लाभत असतो़ यंदाच्या वर्षीही गृहखरेदीसह सोने, दुचाकी व चारचाकी वाहने आणि विविध गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीवर भर दिला जात आहे़ केंद्र व राज्य सरकारने यंदा अर्थसंकल्पातून अनेक नवनवीन योजनांवर भर दिला असून सर्वसामान्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले आहेत़ त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी येत असून आर्थिक उलाढाल वाढत आहे़ तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने चैतन्य लाभले आहे़ गृहकर्ज देण्यासाठी बँकांसह खासगी संस्थाही आघाडीवर असून त्यामुळे रिअल इस्टेल क्षेत्राला प्रतिसाद मिळत आहे़ तर दुचाकी व चारचाकी खरेदीचा देखील उत्साह असून तरूणाईकडून आधीच बुकींग करण्यात आलेली वाहने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केली जात आहेत़ बाजारपेठेत हारकंगण, शोभेच्या गुढ्या, भाजीपाला, कपडे व जीवनावश्यक वस्तु घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे़ नववर्षानिमित्त शनिवारी शहरात भव्य शोभायात्रा निघणार असून त्यानिमित्त बाजारपेठेसह शहरात सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले आहेत़गर्दीने फुलली बाजारपेठगुढीपाडव्यानिमित्त साखरेच्या हार कंगणला धुळेकर नागरिकांकडून शुक्रवारी मोठी मागणी होती. दरम्यान, गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला शहरातील मुख्य बाजारपेठ व पाच कंदीलसह परिसरात ठिकठिकाणी विक्रेत्यांनी त्यांची दुकाने थाटली होती. दिवसभरात लाखो रुपयांची उलाढाल झाली. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी विधीवत पूजन करत काठीचा आधार घेऊन घरावर गुढी उभारली जाते़ त्यावर हारकंगण लावले जाते़ गुढीच्या पूजेत त्याचे विशेष असे महत्त्व आहे़ तसेच गुढीपाडव्यानिमित्त शहरातील फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा परिसरात तयार गुढ्या यावर्षी दिसून आल्या. त्या खरेदीकडेही ग्राहकांचा कल दिसत होता.हारकंगण खरेदीसाठी गर्दीबाजारात कितीही तेजी असली तरी त्याला प्रतिसाद लाभत असतो़ यंदाच्या वर्षीही गृहखरेदीसह सोने, दुचाकी व चारचाकी वाहने आणि विविध गृहपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तु खरेदीवर भर दिला जात आहे़
नववर्षानिमित्त बाजारपेठेत चैतन्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 11:01 PM